सौ सोनार की, एक पवार की – शत्रुघ्न सिन्हा

सौ सोनार की, एक पवार की – शत्रुघ्न सिन्हा

‘सौ सोनार की, एक पवार की’, असं कॅप्शन लिहून बॉलिवूड अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. त्यांनी या कॅप्शनचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचे फोटो आहेत. या फोटोसोबतच त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींवर भाष्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा?

‘एकीकडे घाई गडबडीतील निर्णय, अर्ध्या रात्रीचे नाटकं आणि सकाळच्या चहाचा घोट घेण्यापूर्वीच स्थापन करण्यात आलेलं सरकार, ज्यामध्ये फक्त एका व्यक्तीचं गर्व आणि दोन लोकांचं सैन्य होतं. त्याचा भयानक निकाल समोर आला (असे लोकांचं म्हणण आहे). तर दुसरीकडे महान मराठा नेता आणि आजचे महापुरुष शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल हे दिग्गज नेते असताना तुम्हाला सरकार स्थापन करण्याची घाई कसली होती? अखेर पवारांनी केंद्राच्या पायाखालची जमिन सरकावून दाखवली’, असे शत्रुघ्न सिन्हा ट्विटमध्ये म्हणाले.

First Published on: November 27, 2019 7:21 PM
Exit mobile version