शरद पवार नाही तर ‘ही’ व्यक्ती व्हावी पंतप्रधान – प्रकाश आंबेडकर

शरद पवार नाही तर ‘ही’ व्यक्ती व्हावी पंतप्रधान – प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर हे शरद पवारांना पंतप्रधान पदाचे दावेदार मानत नाहीत.

सतराव्या लोकसभेसाठी सध्या मतदान सुरू आहे. २३ मे नंतर ज्यांचे सरकार स्थापन होईल, त्यांच्यापैकी कोण पंतप्रधान होणार यावर अनेकजण तर्कवितर्क लढवत आहेत. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी मायावती, ममता बॅनर्जी आणि चंद्राबाबू नायडू हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असू शकतात, असे म्हटले होते. तर राष्ट्रवादीचे नेते खासदार माजिद मेनन यांनी पंतप्रधानपदासाठी शरद पवारच योग्य असल्याचे सांगितले होते. मात्र वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते प्रकाश आंबेडकर यांनी मात्र वेगळे मत मांडले आहे. “शरद पवार यांना पंतप्रधानपदासाठी मी योग्य उमेदवार मानत नाही. तसेच ममता, मायावती आणि चंद्राबाबू नायडू हे देखील पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केले आहे. तर माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांनी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, असेही ते म्हणाले आहेत.

फक्त शरद पवारच नाही तर नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी हे देखील पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, असे आंबेडकर म्हणाले. तसेच यंदाच्या निवडणूकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळवता येणार नाही. दिडशे ते दोनशे दरम्यान भाजपला जागा मिळतील, तसेच काँग्रेसच्या जागा वाढतील, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.

 

 

First Published on: May 2, 2019 6:02 PM
Exit mobile version