दिल्लीत शरद पवार- संजय राऊत भेट, मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांचे मोठं वक्तव्य

दिल्लीत शरद पवार- संजय राऊत भेट, मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांचे मोठं वक्तव्य

दिल्लीत शरद पवार- संजय राऊत भेट, मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांचे मोठं वक्तव्य

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यात मागील १२ दिवसांत ३ वेळा भेट झाली आहे. पवार-किशोर भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांच्या दरम्यान शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असतील अस स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलं असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत धुसपूस सुरु असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदाराच्या तक्रारीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या ड्रीम प्रोजेक्टला स्थगीती दिल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात येत होत्या यानंतर मुख्यमंत्र्यांनी २४ तासात डॅमेज कंट्रोल करत दुसऱ्या जागी सदनिका देण्याचा निर्णय घेतला आहे. जितेद्र आव्हाड यांनी स्वतः महाविकास आघाडीमध्ये सार काही सुरळीत असल्याचे सांगितले आहे. यावर शरद पवार यांनीही आता शिक्कामोर्तब केला आहे.

खासदार संजय राऊत दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीतील शरद पवार यांच्या निवास्थानी त्यांनी पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीची माहिती संजय राऊत यांनी ट्विट करत दिली आहे. शरद पवार यांना भेटलो. दिल्ली महाराष्ट्रातील घडामोडींवर चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारच्या स्थिरते संदर्भात त्यांच्या मनात शंका दिसत नाही. उद्धव ठाकरे पाच वर्षाचा कालावधी पुर्ण करतील. ते मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय आहेत असे शरद पवार म्हणाले असल्याचे संजय राऊत यांनी नमूद केलं आहे.

टाटाला जनतेचा वाटा देण्याची गरज काय?

टाटा कॅन्सर रुग्णालयाला म्हडाच्या १०० सदनिका देण्यात आल्या आहेत. यावरुन काँग्रेसनं टीकास्त्र डागलं आहे. राज्य सरकारच्या तिजोरित पैसे नाहीत अशा परिस्थितीमध्ये टाटी आपला सीएसआर फंडचा वापर करायला हवा होता. टाटाला जनतेचा वाटा देण्याची गरज काय होती? अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँगेसनं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी घेतलेल्या निर्णयावर काँग्रेस नाराज असल्याचे दिसत आहेत. तसेच नाना पटोले यांच्या भूमिकेव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये काहीतरी बिघडलं असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

First Published on: June 23, 2021 10:42 PM
Exit mobile version