सत्ता एकाच ठिकाणी राहिल्यास भ्रष्ट होते, उद्धव ठाकरेंचे शरद पवार यांनी केले कौतुक

सत्ता एकाच ठिकाणी राहिल्यास भ्रष्ट होते, उद्धव ठाकरेंचे शरद पवार यांनी केले कौतुक

राज्यातील महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे टिकणार आणि लोकांसाठी काम करणार असा विश्वास राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी सत्ता एकाच ठिकाणी राहिल्यास भ्रष्ट होते. सत्ता भ्रष्ट होऊन द्यायची नसेल तर अधिकांच्या हातात गेली पाहिजे असे शरद पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त शरद पवार बोलत होते. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतही स्तुतीसुमने उधळली आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला आपण सत्तेचे वाटेकरु आहोत वाटले पाहिजे असं शरद पवार यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापनदिनाच्या निमित्त राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी संवाद साधला आहे. शरद पवार यांनी पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांचे कोरोनाकाळात केल्या कामगिरीसाठी कौतुक केले आहे. मराठा आरक्षण,स्थानिक स्वराज्य संस्था यांचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागणार आहेत असं सांगताना सत्ता अधिक हातात राहिली तर ती भ्रष्ट होते असे म्हटले आहे. यामुळे जर सत्ता भ्रष्ट होऊन द्यायची नसेल तर ती अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे. सत्तेतील

मी स्वतः मुख्यमंत्री असताना ग्रामपंचायत, गावचे पोलीस पाटील यामधअयेही ओबीसी आणि इतरांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील एखा गावात गेलो असता चहा घेण्यासाठी एका घरात गेलो तिथे जुने कार्यकर्ते होते. त्यांनी मला म्हटले साहेब हे काम चांगलम नाही केलं आमच्या गावची पाटीलकी गेल्यावर कसं व्हायचं असे म्हटले. यावर नुकसान काय असं विचारलं असता त्यांना उत्तर देता आले नाही. यानंतर पाच ते सात वर्षांनी भेट झाली तेव्हा गाव आता पुर्वीपेक्षा एकत्रित असल्याचे सांगितले याचे कारण सत्ता पिढ्यानंपिढ्या आमच्या घरात ठेवली होती सत्ता अधिक घरी गेली हे लोकांना आवडलं असल्याचे त्यांनी सांगितले असल्याची आठवण शरद पवार यांनी यावेळी सांगितली.

उद्धव ठाकरेंनी मोदींची भेट घेतल्यामुळे चर्चा

राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यानंतर असे कळाले की पंतप्रधान मुख्यमंत्र्यांसोबत स्वतंत्र बैठकीला बसले होते. अनेकांनी त्यावर चर्चा विनिमय केला आहे. कोणी काहीही करो पण लगेच वेगवेगळ्या शंका आणि वावड्या महाराष्ट्रात अनेक लोकांनी उठवल्या आहेत. हा पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आहे आणि आता शिवसेना आहे. शिवसेनेसोबत कधी काम केले नव्हते परंतु महाराष्ट्र अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे पाहत आहे. या सगळ्या गोष्टी फास आहेत. ज्यावेळी काँग्रेसचा देशात परभव झाला अशा वेळी काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक पक्ष पुढे आला तो म्हणजे शिवसेना असे उदाहरणही शरद पवार यांनी सांगितले आहे.

First Published on: June 10, 2021 2:48 PM
Exit mobile version