साई मंदिर भक्तांसाठी होणार खुलं,अशा आहेत वेळा

साई मंदिर भक्तांसाठी होणार खुलं,अशा आहेत वेळा

साई मंदिर भक्तांसाठी होणार खुलं,अशा आहेत वेळा

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्यात रात्रीची संचार बंदी लागू करण्यात आली. अनेक देवस्थाने खुली करण्यावरही अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तमाम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा मंदिरावरही निर्बंध लागू करण्यात आले. मात्र शिर्डीचे साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साई दर्शना नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. साई मंदिर सकाळी ७:१५ ते रात्री ७: ४५ या वेळेत भाविकांना दर्शनासाठी खुले असणार आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे दर्शनाच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय मंदिर प्रशानसानाने घेतला आहे.

शिर्डीच्या साई मंदिरात दर्शनाची वेळ बदलली असली तरी मंदिरात होणारी काकड आरती आणि इतर आरत्यांच्या वेळा त्याच असणार आहेत. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र आरतीसाठी भाविकांना प्रवेश निषिद्ध असणार आहे. त्याचप्रमाणे मंदिरात मिळत असलेल्या साई भोजनाच्या वेळेतही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. सकाळी १० ते रात्री ७:३० पर्यंत भाविकांना साई भोजनाचा लाभ घेता येणार आहे.

राज्यात कोरोचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता साई मंदिरात प्रवेश करण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे पालन न केल्यास भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे नियम मोडल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते.


हेही वाचा – राज्यात लॉकडाऊन होणार; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला तयारी करण्याचे आदेश
First Published on: March 28, 2021 6:16 PM
Exit mobile version