LIVE : राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सकारात्मक चर्चा झाली – पृथ्वीराज चव्हाण

LIVE : राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सकारात्मक चर्चा झाली – पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १ महिना होत आला. मात्र, अजूनही राज्यात सत्ता स्थापनेचा प्रश्न काही सुटलेला नाही. एकीकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नव्या ‘महाविकासआघाडी’ने सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, आज मुंबईत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एक बैठक होणार आहे. त्यानंतर ‘महाविकासआघाडी’ विषयी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे राज्यात पुढील पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल आणि कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री असतील अशी चर्चा सध्या सुरु आहे.
A view of the sea
Rashmi Mane

राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये झालेल्या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

Rashmi Mane

राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सकारात्मक चर्चा झाली. ही चर्चा उद्याही होईल.

Rashmi Mane

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अजूनही चर्चा सुरू

Rashmi Mane

कोणताही मुद्दा सुटू नये यासाठी चर्चा – उद्धव ठाकरे

Rashmi Mane

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्वसंमती झाली आहे – पवार

First Published on: November 22, 2019 10:15 AM
Exit mobile version