शरयू नदीच्या तीरावर आदित्य ठाकरेंच्या हस्ते महाआरती, शिवसैनिकांनी केली एकच गर्दी

शरयू नदीच्या तीरावर आदित्य ठाकरेंच्या हस्ते महाआरती, शिवसैनिकांनी केली एकच गर्दी

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) हे आज अयोध्या दौऱ्यावर (ayodhya visit)
आहेत. यावेळी अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी (Shivsena) त्यांचं जंगी स्वागत केलं. त्यानंतर त्यांनी हनुमान गढीचं दर्शन घेऊन राम लल्लाचं दर्शन घेतलं. राम लल्लाचं दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी शिवसैनिकांच्या उपस्थितीत शरयू नदीच्या तीरावर आरती पार पडली. आरती पार पडताना शिवसैनिकांनी एकच गर्दी केली होती.

रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर आदित्य ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांसह शरयू नदीच्या तीरावर पोहोचले होते. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार चंद्रकांत खैरे यांच्यासह सेनेचे प्रमुख नेते हजर होते. आदित्य ठाकरे यांनी दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातील रामभक्तांसाठी खूप मोठी घोषणा केली आहे. अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरेंनी केली आहे.

अयोध्येत आम्ही राजकारण करण्यासाठी नाही तर तिर्थयात्रेसाठी आलो आहोत. या ठिकाणी राजकीय विषय काढणे उचित नसेल. आमचे हिंदुत्व स्पष्ट आहे, त्यामुळे अयोध्येला आम्ही राजकारणासाठी आलो नाही तर तिर्थयात्रेसाठी आलो आहोत. अयोध्येत आम्ही १०० खोल्यांचे महाराष्ट्र सदन बांधणार असल्याचे सांगताना मुंबई महापालिकेमध्ये रामराज्य येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत शिवसेना नेते संजय राऊत तसेच शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, दोन वर्षांनंतर अयोध्या दौऱ्यावर आलो आहे, उत्साह तोच आहे. माझ्यासोबत सर्व शिवसैनिक आले आहेत. येथे आम्ही राजकारण करायला आलो नाही, आम्ही तिर्थयात्रेला आलो आहोत. अयोध्येत १०० खोल्यांचे महाराष्ट्र सदन बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहेत, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

दरम्यान, मुंबई, नाशिक आणि पुण्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. त्यामुळे आज दिवसभर अयोध्येत शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केले जात आहे.


हेही वाचा : अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारणार, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा


 

First Published on: June 15, 2022 9:15 PM
Exit mobile version