शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेची हायकोर्टात याचिका, उद्या होणार सुनावणी

शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेची हायकोर्टात याचिका, उद्या होणार सुनावणी

मुंबई – शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागीतली होती. याबाबत शिवसनेने हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. शिवसेनेने गणेशोत्सवापूर्वीच महापालिकेकडे शिवाजी पार्क मैदानासाठी परवानगीसाठी अर्ज दाखल केला होता. पण महापालिकेच्या जी-उत्तर प्रभागाने यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. या प्रकरणी शिवसेनेने तातडीने सुनावणीची मागणी हायकोर्टात करण्यात आली होती. यावर हायकोर्ट उद्या सुनावणी करणार आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. गणेशोत्सवापूर्वीच शिवसेने महापालिकेकडे मैदानासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर काही दिवसांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज दाखल केला होता. दोन्ही गटांच्या अर्जावर महापालिकेने कोणताही निर्णय घेतलेला नाही. दरम्यान शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेत मुंबई महापालिका आणि राज्य सरकार यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

महापालिकेवर राज्य सरकारचा दबाव –

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळू नये यासाठी राज्य सरकारचा महापालिकेवर दबाव असल्याचा आरोप शिवसेनेचे विभागप्रमुख मिलिंद वैद्य यांनी केला होता. 1 महिना झाला तरी परवानगीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. दुसऱ्या गटाने बीकेसीसाठी परवानगी मागितली होती, त्यांना ती मिळाली आहे. त्यांनी पैसेही भरले आहेत. एकाच ठिकाणी दोन गटाने अर्ज केला असता तर त्याचा विचार केला गेला असता. आता तोही प्रश्न उरला नाही. या मेळाव्याला परवानगी देताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्याचा इथे काही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेकडून कोणत्याही परिस्थितीत शिवतीर्थावर मेळावा घेतला जाणार असल्याचे वैद्य यांनी सांगितले.

 

First Published on: September 21, 2022 11:51 AM
Exit mobile version