उदयनराजे खालच्या पातळीवर उतरतील, असे वाटले नव्हते – शिवेंद्रराजे

उदयनराजे खालच्या पातळीवर उतरतील, असे वाटले नव्हते – शिवेंद्रराजे

उदयनराजे भोसले

राजघराण्याच्या तत्त्वांची काळजी आहे तर, तुमच्या लोकसभा मतदारसंघातील सर्वच दारू दुकाने बंद करा. ज्या पालिकेत त्यांची सत्ता आहे, त्या सातारा शहरात किती बोंबाबोंब सुरू आहे, हे पाहायला उदयनराजेंना वेळ नाही. सातारा शहर सोडा संपूर्ण मतदारसंघात काय समस्या आहेत, दुष्काळामुळे लोक होरपळत आहेत, याचे त्यांना काहीही देणेघेणे नाही; पण खुटाळेची जागा मात्र त्यांना महत्त्वाची वाटते. दुकाने पाडणे आणि जागा मोकळ्या करून देण्यासाठी खासदार जात असतील तर, याला सुपारी घेणे म्हणायचे नाही तर काय म्हणायचे? असा सवाल आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

कोण कुणाला आडवं करतंय बघू – उदयनराजे

जुना मोटार स्टँड परिसरात जो काही प्रकार झाला तो कशामुळे झाला हे सातारकरांना माहिती आहे. विषय दारू दुकानाचा नव्हता, विषय होता तो त्यांच्या बगलबच्च्यांची जागा खाली करून देण्याचा. जागेचा वाद न्यायप्रविष्ट असताना आणि जागा खाली करण्याबाबतचा कोणताही लेखी आदेश नसताना उदयनराजेंनी धाकदपटशाही, दहशत आणि दंडेलशाहीचा वापर करून रवी ढोणे यांचे दुकान पाडण्याचा प्रयत्न केला. हा पूर्णपणे नियोजनबद्ध प्लॅन होता; पण मी आणि पोलिस यांच्यामुळे उदयनराजेंचा प्लॅन उधळला गेला, असा आरोप या पत्रकाद्वारे शिवेंद्रराजे यांनी केला आहे.

दारुच्या दुकानासमोर भिडले उदयनराजे – शिवेंद्रराजे

ते पुढे म्हणाले की, तुमचे जागा बळकावण्याचे पितळ उघडे पडले म्हणून तुम्ही दारू दुकान, दारू दुकान म्हणून ओरडत आहात. एवढेच तत्त्वनिष्ठ असाल तर, रवी ढोणेचेच का? तुमच्या मतदारसंघातील सर्वच दारू दुकाने बंद करून दाखवावीत. माझ्या घरावर कोणी चाल करून येत असेल तर, मी शांत कसा बसेन, असे आव्हानच शिवेंद्रराजे यांनी दिले आहे.

First Published on: October 27, 2018 7:19 PM
Exit mobile version