निवडणूक येईपर्यंत ते भाजपमध्ये राहतील का? हा त्यांचा चौथा पक्ष; राणेंच्या टीकेवर आदित्य ठाकरेंचा पलटवार

निवडणूक येईपर्यंत ते भाजपमध्ये राहतील का? हा त्यांचा चौथा पक्ष; राणेंच्या टीकेवर आदित्य ठाकरेंचा पलटवार

मुंबईत फक्त भाजपाचा खासदार निवडून येईल असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानावर आता शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत नारायण राणे भाजपमध्ये राहतील की नाही असा प्रश्न असल्याचा टोला लगावत आदित्य ठाकरेंनी नारायण राणेंना त्यांच्या बंडखोरीची आठवण करून दिली. यावेळी आदित्य ठाकरेंनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही टीकेला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, दक्षिण मुंबईत भाजपचाच खासदार निवडूण येईल, शिवसेनेचा एकही खासदार निवडूण येणार नाही. याची आम्ही काळजी घेऊ, असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर देत राणेंना त्यांनी केलेल्या गद्दारीची आठवण करत टोला लगावला.

निवडणूक येईपर्यंत नारायण राणे भाजपामध्ये राहतील का? हा त्यांचा चौथा पक्ष आहे. मी त्यांच्यावर जास्त बोलत नाही, कारण जेव्हापासून त्यांवी गद्दारी केली आणि पक्ष सोडून गेले तेव्हापासून ते आपल्या कामाबद्दल अजिबात बोलले नाही, अशा जहरी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.

नुसतं आमच्यावर बोलायचं आमच्याबद्दल वाईट बोलायचं हा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. आमच्या मनात तरी असं काही नाही. अशा लोकांकडे कमीत कमी लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करू शकतो, असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.

घड्याळ बंद पाडणं आणि मशाल विझवणं हेच आमचं टार्गेट असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते. तसेच उद्धव ठाकरे आता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून दूर जात असल्याची टीकाही त्यांनी केली होती, ज्यावर आता आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांना बोलू दे, यातून त्य़ांची वृत्ती समोर येतेय. सूडबुद्धीने काम करत असून द्वेषाचं राजकारण सुरु आहे. आजवर झालेल्या निवडणुकांमध्ये एकमेकांना संपवण्याची भाषा कोणीही वापरली नव्हती. आतापर्यंत जे काही राजकराण झालं आहे त्याला पातळी राखली जात होती. पण गेल्या पाच सहा वर्षात रुपयाप्रमाणे ती पातळी घसरत चालली आहे”.


अंधेरी पूर्व मतदारसंघ पोट निवडणूक ; १४ उमेदवारांचे अर्ज वैध

First Published on: October 16, 2022 12:13 PM
Exit mobile version