जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा भगवा; जयश्री महाजन नव्या महापौर

जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा भगवा; जयश्री महाजन नव्या महापौर

जळगाव महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन

भाजपने सांगलीपाठोपाठ जळगाव महानगरपालिकेची सत्ता देखील गमावली आहे. शिवसेनेच्या उमेदवार जयश्री महाजन जळगावच्या नव्या महापौर झाल्या आहेत. जयश्री महाजन यांना ४५ मत पडली आहेत. तर भाजपच्या उमेदवार प्रतिभा कापसे यांना ३० मतं पडली. जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. महापौर निवडणुकीच्या अगोदरच सत्ताधारी भाजप मधील काही नाराज नगरसेवक गळाला लागल्याने महापौर शिवसेनेचाच होणार असा दावा करण्यात येत होता. दरम्यान हा पराभव भाजपचे आमदार गिरीश महाजन यांना धक्का मानला जात आहे.

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसनं जयंत पाटलांच्या नेतृत्त्वात ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्यानंतर आता जळगाव महापालिकेत शिवसेनेनं भाजपला जोरदार दणका दिला आहे. भाजपच्या फुटीर नगरसेवकांच्या मदतीनं शिवसेनेनं जळगाव महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे सलग दुसरी महापालिका भाजपच्या हातातून निसटली आहे.

जळगाव महापालिकेच्या महापौरपदासाठी आज ऑनलाईन निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा तब्बल १५ मतांनी पराभव करत बाजी मारली. जयश्री महाजन यांना ४५ मतं मिळाली, तर प्रतिभा कापसे यांना ३० मते मिळाली. भाजपचे २७ नगरसेवक फुटल्याने व एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी देखील शिवसेनेच्या पारड्यात मत टाकल्यानं शिवसेनेचा भगवा फडकला.

First Published on: March 18, 2021 1:33 PM
Exit mobile version