सरनाईकांच्या पत्रानंतर सेनेच्या जेष्ठ नेत्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र, काँग्रेसच्या आमदारावर केला आरोप

सरनाईकांच्या पत्रानंतर सेनेच्या जेष्ठ नेत्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र, काँग्रेसच्या आमदारावर केला आरोप

सरनाईकांच्या पत्रानंतर सेनेच्या जेष्ठ नेत्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र, काँग्रेसच्या आमदारावर केला आरोप

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्राने खळबळ उडाल्यानंतर आता सेनेच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत काँग्रेसच्या आमदारावर आरोप केले आहेत. शिवतारे यांनी पुणे जिल्ह्यातील पुरंदर हवेली मतदारसंघाचे आमदार संजय जगताप यांच्यावर कामात अडथळा आणण्याचे काम करत असल्याचा आरोप केला आहे.

संजय जगताप यांनी गुंजवणी योजनेच्या पाईपलाईचे काम अधिकाऱ्यांना धमकावून बंद पाडल्याचा आरोप शिवतारे यांनी केला आहे. कामाचे भूमिपूजन स्वतःच्या हस्ते करावे असा त्यांचा आग्रह असल्याचे समजते, असा आरोप देखील शिवतारे यांनी केला आहे. या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व्हावा, तो ऑनलाईन झाला तरी चालेल, अशी मागणीही विजय शिवतारे यांनी पत्रातून केली आहे.

काय म्हटलंय पत्रात?

“राज्यमंत्री पदाच्या काळात मोठ्या मेहनतीने मी पुरंदर, भोर आणि वेल्हा या तीन तालुक्यांना वरदान ठरणारे गुंजवणी धरण पूर्ण केले. प्रकल्पाच्या पाईपलाईनच्या कामालाही मागील वर्षी सुरुवात झाली. भोर आणि वेल्हा तालुक्यात काम सुरू आहे. योजना लवकर पूर्ण करण्याच्या हेतूने जलसंपदा विभागाशी समन्वय साधत काही दिवसांपूर्वी मी पुरंदर तालुक्यातही जलवाहिनीच्या कामाला सुरुवात केली. मात्र या कामात सातत्याने अडथळे आणण्याचे काम स्थानिक आमदार संजय जगताप करत आहेत. आमदार संजय जगताप यांनी अधिकाऱ्यांना धमकावून गुंजवनीचे काम बंद सूचना दिल्या आहेत. तसेच कामाचे भूमिपूजन स्वतःच्या हस्ते करावं असाही आग्रह असल्याचे समजते,” असं शिवतारे यांनी पत्रात लिहिलं आहे.

 

First Published on: June 28, 2021 6:31 PM
Exit mobile version