प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ; ईडीच्या अहवालात गंभीर आरोप

प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ; ईडीच्या अहवालात गंभीर आरोप

मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे पाय आणखी खोलात जाताना दिसत आहेत. ईडीने आतापर्यंत केलेल्या तपासानुसार ईडी कोठडी अहवाल तयार केला आहे. या अहवालात ईडीने थेट प्रताप सरनाईक यांचे नाव घेतले असून प्रताप सरनाईक यांच्यावर ईडी कोठडी अहवालात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे आता प्रताप सरनाीक यांच्या अडचमीत वाढ होताना दिसत आहेत.

ईडीने अहवाल न्यायालयाला दिला आहे. या अहवालात MMRDA मधील बनावट टॉप्स सुरक्षा रक्षकांची अर्धी रक्कम प्रताप सरनाईकांना जात होती, असा दावा इडीने न्यायालयासमोर केला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले प्रताप सरनाईक यांच्या जवळचे अमित चंडोळे याला अटक केल्यानंतर त्याची ईडी कोठडी मिळावी याकरता ईडीने त्यांच्या कोठडी अहवालात प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ईडीने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात थेट प्रताप सरनाीक यांचे नाव घेतले आहे. ईडीच्या सहाय्यक संचालक अर्चना सलाये यांनी हा ईडी कोठडी अहवाल न्यायालयात सादर केला आहे.

 

First Published on: November 27, 2020 11:25 AM
Exit mobile version