केंद्रीय यंत्रणांची मदत घेऊन सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न – संजय राऊत

केंद्रीय यंत्रणांची मदत घेऊन सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न – संजय राऊत

राऊतांकडून आचारसंहितेचं उल्लंघन, किरीट सोमय्या कारवाईच्या मागणीसाठी दिल्ली दौऱ्यावर

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. किरीट सोमय्यांना आज पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्यांच्या या आरोपांवर आणि टीकेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर केंद्र सरकारच्या पाठ बळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे.” असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत मुंबईत आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “नाट्यामध्ये एक सत्यता असते. महाराष्ट्रामध्ये मराठी नाट्याला एक प्रतिष्ठा आहे. कालपासून जे घडतयं किंवा घडवलं जातय. विरोधी पक्षांकडून सतत आरोप करुन लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणं… हा काही दिवसांपासून विरोधी पक्षांकडून उपक्रम राबवला जात आहे…. मी धंदा म्हणणार नाही.” असा आरोप राऊत यांनी केला आहे.

“काल आरोप करणाऱ्यांवर जी कारवाई झाली आहे. मला वाटतं ती गृहमंत्र्याने केलेली कारवाई आहे. यामध्ये आकस किंवा सूड या शब्दांचा वापर कोणी करु नये. मी सर्व माहिती घेतली. गृहमंत्रालयाला कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न निर्माण होतीस असं वाटलं .. दोन्ही बाजूने.. आणि त्यातून ही कारवाई झाली. यावरून मुख्यमंत्र्यांवर व्यक्तीश: आरोप करण्याचे कारण नाही. याकडे जरी कोणी त्या दृष्टीने पाहत असेल तर, मुख्यमंत्री अशा लहान गोष्टींकडे पाहत नाही. पुढे अशाप्रकारचे खोटेनाटे आरोप केले किंवा बुडबुडे सोडले म्हणून आमच्या सरकारला भोग पडतं नाहीत. हे आम्हाला माहिती आहे.” असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

“केंद्र सरकारवर रोज आरोप होत आहेत. इतर राज्यात भाजपाचे सरकार असणाऱ्यांवर रोज आरोप होत आहेत. तुमच्याकडे आरोप करण्यापूर्वी काही पुरावे असतील तर महाराष्ट्रात पोलीस आहेत. महाराष्ट्रात यंत्रणा आहे. महाराष्ट्रामध्ये अँटीकरप्शन ब्युरो आहे…. महाराष्ट्रामध्ये ओडब्यू आहे. महाराष्ट्र पोलीस दल हे प्रतिष्ठीत पोलीस दल आहे. या सगळ्या यंत्रणा राज्यात कोणताही पक्षपात न करता तपास करतात. पण तुम्ही केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर.. आदेशाने… केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने महाराष्ट्रातील मंत्र्यांवर महाराष्ट्रातील प्रमुख लोकांवर असे आरोप करत असतात. आणि त्यातून कायदा आणि सुव्य़वस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर राज्याचे गृहमंत्र्यालय त्यावर कारवाई करु शकतात.” असंही राऊत म्हणाले.

”यात आता फार राष्ट्रीय स्तरावर दखल घ्याची गरज नाही. शेवटी यंत्रणा हातीशी असल्यावर तुम्ही म्हणतात तसे नाट्य, हायहोल्टेज ट्रामा शब्द वापरले जातायत. मी मुख्यमंत्र्यांशी यावर बोललो. सोमय्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरही आरोप केले. त्यांनी आमच्या मंगळावर,चंद्रावर जाऊन पाहणी करावी. लोकशाहीत त्यांना बोलायचा अधिकार आहे. केंद्राच्या सूचनेनुसार आरोप करायचे तर करु द्या. आरोप करणं हे फॅशन झाली आहे. कळेल त्यांना आमचा रंग कोणता आहे. मी या विषयावर मुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यांनी सांगितलं त्याचा मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंध नाही. ”असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.


 

First Published on: September 20, 2021 10:48 AM
Exit mobile version