सेनेचा मुख्यमंत्री न झाल्यामुळे केला आत्महत्येचा प्रयत्न!

सेनेचा मुख्यमंत्री न झाल्यामुळे केला आत्महत्येचा प्रयत्न!

सेनेच्या मुख्यमंत्री न झाल्यामुळे केला आत्महत्येचा प्रयत्न!

राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी, सकाळीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. सर्वांसाठीच ही गोष्ट खूप धक्कादायक होती. दरम्यान, वाशीम जिल्ह्यात राहणाऱ्या रमेश बाळू जाधव या व्यक्तीनं आपली भावना एका वेगळ्याच प्रकारे व्यक्त केली. जाधव यांना ही बातमी कळल्यानंतर ते फार नाराज झाले आणि त्यांनी ब्लेडनं आपला हात कापला आणि आत्महत्येचा प्रयत्न केला असून शिवसेनेचा मुख्यमंत्री न झाल्यामुळे जाधव यांनी हा प्रकार केल्याचे बोलले जात आहे.

कोण आहेत जाधव?

वाशीम जिल्ह्यातील उमारी गावात राहणारे रमेश जाधव हे शिवसेनेचे समर्थक आहेत. तर प्रत्येक शिवसैनीकासारख जाधव यांची देखील इच्छा होती की, मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच व्हावा. पण, २३ नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस यांच्या शपतविधीनंतर सगळ्याच शिवसैनिकांना धक्का बसला.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; महाराष्ट्रात शपथविधी झाल्यानंतर शनिवारी संध्याकाळी मनोरा चौक येथे काही कामासाठी जाधव तेथे आले होते. देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीबद्दल त्यांना कळाल्यानंतर मद्यधुंद स्थितीत असलेल्या जाधव यांनी आपल्या हातावर अनेकदा ब्लेड मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. तर तिथे असलेल्या एका वाहतूक पोलिसांनी घडलेला सर्व प्रकार पाहिला आणि त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमध्ये जाधव हे जखमी झाले असून त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती डिगरस पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जाधव हे मद्यपानाच्या प्रभावाखाली होते आणि त्या कारणामुळे त्यांनी हे कृत्य केलं असावं’

– पोलीस अधिकारी

First Published on: November 25, 2019 2:46 PM
Exit mobile version