शिवसेनेचे संख्याबाळ आता ६२वर, सहा अपक्ष आमदारांचा पाठिंबा

शिवसेनेचे संख्याबाळ आता ६२वर, सहा अपक्ष आमदारांचा पाठिंबा

साक्री विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष आमदार मंजुळा गावीत यांचा शिवसेनेला पाठिंबा

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ५६ जागांवर यश मिळाले आहे. तर भाजपला १०५ जागांवर यश आले आहे. सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज भासणार हे आता निश्चित झाले आहे. तरीदेखील दोन्ही पक्ष एकमेकांची ताकद वाढवण्यासाचा पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. शिवसेनेला आतापर्यंत पाच अपक्ष आमदारांनी पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर साक्री विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष आमदार मंजुळा गावीत यांनी देखील शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी त्यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंब्याचे अधिकृत पत्र दिले आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे संख्याबळ ६२वर पोहोचले आहे.


हेही वाचा – महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमका होणार तरी कोण?


 

आतापर्यंत ‘या’ आमदारांनी शिवसेनेला दिला पाठिंबा

शिवसेनेला आतापर्यंत अपक्ष आमदार बच्चू कडू, राजकुमार पटेल, आशिष जैसवाल, नरेंद्र भोंडेकर आणि शंकरराव गडाख यांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यानंतर आता साक्री विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष आमदार मंजुळा गावीत यांनी देखील शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांच्या सोबत मंजुळा गावीत यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची घेतली भेट घेतली. मंजुळा गावीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकारी म्हणून कार्यरत होत्या.

First Published on: October 30, 2019 5:55 PM
Exit mobile version