पुण्यात फालूदा खाताना तोंडात आले ब्लेड

पुण्यात फालूदा खाताना तोंडात आले ब्लेड

पुण्यात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. पुण्यातील रस्त्यावर असणाऱ्या फालूदा विक्रेत्याकडून फालूदा घेणं चांगलंच महागात पडलं आहे. हा रस्त्यावरील फालूदा खात असताना त्यामध्ये धारधार ब्लेड दिसल्याने
या व्यक्तीने पोलिसात तक्रार नोंदवली आहे. हा व्यक्ती पुण्यातील एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. पुण्यात रस्त्यावरील फालूदा विक्रेत्याकडून फालूदा विकत घेतल्यानंतर त्यात ब्लेड निघालं असून या व्यक्तीला किरकोळ इजा झाली आहे.

असा घडला प्रकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज सुरेश आहुजा हे आपल्या कुटुंबा सोबत पिंपळे सौदागर येथील उच्चभ्रू वसाहतीत बदाम शेकचा आस्वाद घेण्यासाठी गेले होते. तेव्हा, कुणाल आयकॉन सार्वजनिक रस्त्यावर असलेल्या महावीर आईस्क्रीम येथे गेले. फिर्यादी यांनी बदाम शेक घेतले तर इतर कुटुंबातील व्यक्तींनी फालुदा घेतला. फिर्यादी हे बदाम शेक खात असताना अचानक तोंडात टोकदार वस्तू लागली. ती वस्तू बाहेर काढली असता ब्लेड असल्याचे त्यांना दिसले. यात ते किरकोळ जखमी झाले असून याबाबत आरोपी रतनलाल यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. यावर त्यांनी माफी मागितली असल्याचे पोलिसांनी सांगितले असून गंभीर बाब असल्याने आहुजा यांनी सांगवी पोलिसात तक्रार दिली आहे.

घटने प्रकरणी आरोपी रतनलालला अटक करण्यात आली असून त्याची जामीनावर सुटका झाली आहे. दरम्यान, सार्वजनिक किंवा इतर ठिकाणी आपण खाद्यपदार्थ आणि पेय पित असाल तर सावधगिरी बाळगावी, असे आवाहन गुन्हे पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी केलं आहे. घडलेला प्रकार हा अत्यंत धक्कादायक आहे यात काही शंकाच नाही. मात्र, असा प्रकार पुन्हा दुसऱ्यांसोबत घडू नये म्हणून नागरिकांनी स्वतः ची काळजी घेणे गरजेचे आहे.


हेही वाचा- अबब! इंग्लंडमधील ३५ कोटी…१८ कॅरेट… सोन्याचं कमोड गेलं चोरीला!

यावेळी सॉफ्टवेअर इंजिनिअर असणाऱ्या मनोज सुरेश आहुजा यांनी थेट सांगवी पोलीस ठाणे गाठून त्या विक्रेत्याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारी नंतर फालूदा विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली. मात्र त्याला जामिनावर सोडून दिले.

First Published on: September 16, 2019 2:00 PM
Exit mobile version