डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

भाजप खासदरला होणार आटक; बनावट जातप्रमाणपत्र प्रकरण भोवलं

सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी लोकसभा निवडणुकीत बोगस जात प्रमाणपत्र दाखल केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहेत. जिल्हा जातपडताळणी समितीने जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. न्यायालयाने सीआरपीसी १५६ (३) नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. सोलापुरातील बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. जिल्हा जात पडताळणी समितीने जात प्रमाणपत्र दाखल अवैध ठरवल्यानंतर अक्कलकोटचे तहसीलदार संतोष शिरसट यांनी न्यायालयात फिर्याद दाखल केली आहे. त्यामुळे तहसीलदारांनी नोंदवलेल्या जबाबानंतर सोलापूर जिल्हा न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले होते.

डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी लोकसभा निवडणुकीत १९८२ सालचा बेडा जंगम जातीचा दाखला सादर केला होता. आणि हा दाखला बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, विनायक कंडकुरे यांनी केली होती. त्यावर सोलापूर जिल्हा जात पडताळणी कार्यालयात १५ फेब्रुवारी रोजी अंतिम सुनावणी पार पडली. त्यानंतर हा निकाल राखून ठेवण्यात आला होता. तो निकाल २४ फेब्रुवारी रोजी करण्यात आला. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी आपण सादर केलेला दाखला वैध असल्याचे सांगत सन १३४४ व १३४७ सालातील मोडी लिपीतील नमुना पुराव्यासाठी सादर केला होता. याच्या तपासणीसाठी दक्षता समितीने तपासणी करून आपला अहवाल सादर केला. या अहवालात खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पुराव्यासाठी दाखल केलेला नमुना संशयास्पद असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.


हेही वाचा – आता तर जयसिद्धेश्वरांचा जातीचा दाखलाच हरवला…!


पोलीसात तक्रार दाखल

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रावरून चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात येते की काय? अशीही बातमी पसरली होती. परंतु आता आणखी एक बातमी समोर आली आहे. प्रवासादरम्यान जातीचा दाखला हरवला, अशी तक्रार जयसिध्देश्वर शिवाचार्य यांच्यावतीने करण्यात आली होती. ९ फेब्रुवारी रोजी प्रवासादरम्यान दाखला हरवल्याची तक्रार १४ फेब्रुवारी रोजी पोलिसात दाखल करण्यात आली आहे.


हेही वाचा – व्हायरल चेक: व्हिडिओत नाचणारे ‘ते’ स्वामी भाजपचे उमेदवार नाहीत


 

First Published on: March 5, 2020 8:39 AM
Exit mobile version