काहीचे लक्ष मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे; जयंत पाटील यांचा भाजपला टोला

काहीचे लक्ष मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे; जयंत पाटील यांचा भाजपला टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून सुरू असलेला वाद आता मिटला असला तरी आता सत्ताधारी भाजपवर टीका करताना पाहायला मिळत आहे. काहीचे लक्ष हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खुर्चीकडे होते असा टोला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला लगावला. निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. नोटिफिकेशनही निघाले आहे. आता आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते बसून, सूसूत्रता ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने निवडणुका करु. किमान आता झाले गेलं विसरुन जाऊन, निवडणुका बिनविरोध कशा होतील, हे बघण्याचं प्रयत्न आम्ही करु, असे देखील जयंत पाटील यावेळी म्हणाले.

काही लोकांचे लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीकडे होते. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. आम्ही त्याकडे काही लक्ष दिले नाही. आम्ही मंत्रिमंडळाच्या रेग्युलर बैठकीत दोनवेळा ठराव करुन एकदा जाऊन राज्यपालांना भेटलो असे म्हणत त्यापलीकडे आम्ही या गोष्टीला जास्त महत्त्व दिले नसल्याचे जयंत पाटील म्हणालेत. दरम्यान आम्हाला राज्यातील कोरोनाची काळजी जास्त होती, त्याला प्राधान्य देऊन आम्ही काम करत होतो. त्यामुळे आमचा फारसा वेळ गेला नाही, पण काही लोकांनी या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी बराच काळ घालवला. राज्याच्या बरोबर राहण्याऐवजी ते भरकटत गेले आणि महाराष्ट्र अस्थिर कसा करायचा याचे प्रयत्न काही लोकांनी केले, हे मात्र नक्की असे पाटील यावेळी म्हणालेत.

मात्र त्यांच्या प्रयत्नावर पाणी फिरले

काही लोक राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरले आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो असे जयंत पाटील म्हणालेत. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर सदस्य करा, नियुक्ती करा अशी विनंती केली होती, पण आता उद्धव ठाकरे यांची नियुक्तऐवजी निवडच होणार आहे”, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

दरम्यान आम्ही नियुक्तीबाबत राज्यपालांना विनंती केली होती, लवकर निर्णय होणे अपेक्षित होतं, मात्र झाला नाही, त्यामुळे आम्ही तिन्ही पक्षांनी निवडणूक आयोगाला विनंती करुन ९ जागांसाठी निवडणूक घेण्याची मागणी केली, ती मान्य झाली, आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शंभर टक्के निवडून येतील. अनेक जण देव पाण्यात घालून बसले होते, हे सरकार अस्थिर होईल याचे प्रयत्न झाले, त्या सर्वांना यामुळे चपराक बसली आहे”, असेही जयंत पाटील म्हणाले.

First Published on: May 1, 2020 8:50 PM
Exit mobile version