‘ढोकळ्या’ने ट्रम्प भेटीला देसी टच

‘ढोकळ्या’ने ट्रम्प भेटीला देसी टच

अहमदाबाद येथील न्याहरीसाठी ढोकळा, समोसा

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांच्या भारत भेटीसाठी दिल्लीत जय्यत तयारी सुरू असतानाच, या भेटीला देसी टच देण्यासाठी आता विशेष न्याहरीसाठीची तयारी करण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या मेजवानीत सर्वांचे नेतृत्व करणारे तो म्हणजे गुजरातचा स्पेशल खमण ढोकला. अहमदाबादमधील फॉर्च्युन हॉटेलचे शेफ असलेल्या सुरेश खन्ना यांच्याकडे संपुर्ण खान – पान व्यवस्थेची जबाबदारी देण्यात आली आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी लेडी मेलॅनिया ट्रम्प यांना गुजराती डिशेशची चव चाखवण्यासाठी विशेष मेहनत घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे गुजराती फ्लेव्हरची टच देणारे खमण ढोकला, अनेक धान्याची रोटी हे त्यांच्या उद्याच्या अहमदाबाद भेटीतले जेवण असणार आहे. खुद्द सुरेश खन्ना यांनीही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या जेवणाची तयारी करण्याचा मान मिळणार असल्याचा गर्व व्यक्त केला आहे. गुजरातमधील लोकल टच देणारे खमण, समोसा, मल्टी ग्रेन रोटी, हनी डिप कुकीज, ब्रोकोली या पदार्थांचा समावेश आहे. तसेच नारळपाणी, आईस टी, स्पेशल चहा आणि नाष्ट्याचा समावेश आहे. हा सगळा मेन्यू सुरक्षित निगराणीखाली तयार करण्यात येणार आहे.

दिल्लीतल्या ट्रम्प मोदी भेटीसाठी आता तयारी अंतिम टप्प्यात असून आता दिल्ली आणि अहमदाबाद येथील सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे पहिल्यांदा अहमदाबाद येतील साबरमती आश्रमाला भेट देणार आहेत. त्यानंतर दिल्लीतील मॉटेरा स्टेडिअममध्ये ते नमस्ते ट्रम्प कार्यक्रमात सहभागी होतील.

 

First Published on: February 23, 2020 7:21 PM
Exit mobile version