उन्हाळी सुट्टीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या

उन्हाळी सुट्टीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या

मध्य रेल्वेच्या कोल्हापूर, मुंबई,नागपूरसाठी विशेष साप्ताहिक गाड्या, जाणून घ्या गाड्यांचे विशेष वेळापत्रक

मुलांच्या परिक्षा संपल्या की, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना गावाचे वेध लागतात. उन्हाळी सुट्टीत कोकणात तसेच गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड या दरम्यान दोन्ही मार्गांवर विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. या विशेष गाड्यांना पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांवर थांबेल. या विशेष गाडयांना २४ डबे जोडण्यात येणार आहेत. यामध्ये २ टायर एसीचे १, ३ टायर एसीचे ४ डबे, स्लीपरचे १३ डबे आणि जनरलचे ४ डबे, एसएलआर २ डबे जोडण्यात येतील.

या आहेत विशेष गाड्या – 

गाडी क्रमांक ०१०५१/५२ लोकमान्य टिळक – करमाळी- लोकमान्य टिळक विशेष गाड्या

गाडी क्रमांक ०१०१६/०१०१५ करमाळी – लोकमान्य टिळक – करमाळी विशेष

गाडी क्रमांक ०१०४५/०१०४६ एलटीटी ते करमाळी – एलटीटी विशेष

गाडी क्रमांक ०१०३७/३८ एलटीटी – सावंतवाडी रोड – एलटीटी

First Published on: March 19, 2019 4:55 PM
Exit mobile version