जनतेचे १५ कोटी लागणार मंत्र्यांच्या बंगला दुरूस्तीवर, पहा कोणत्या बंगल्यावर किती खर्च

जनतेचे १५ कोटी लागणार मंत्र्यांच्या बंगला दुरूस्तीवर, पहा कोणत्या बंगल्यावर किती खर्च

रामटेक बंगला

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी बंगल्यावर सुरू केलेल्या खर्चामुळे अजितदादांनी आपल्याच स्टाईलमध्ये तंबी दिली आहे. एकुण ३१ बंगल्यांच्या दुरूस्तीवर जवळपास १५ कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळेच अनाठायी खर्च करू नका असा सूचना वजा इशाराच अजितदादांनी मंत्र्यांना दिला आहे. प्रत्येक बंगल्यावर सरासरी ८० लाखांपासून ते दीड कोटी रूपये इतका खर्च येणार आहे. सर्वाधिक खर्च हा खुद्द छगन भुजबळ यांच्या रामटेक बंगल्यावरच येणार आहे.

 

असा आहे अजितदादा यांचा चिमटा

बंगल्याची केवळ संरचनात्मक दुरूस्ती करा. कोणत्याही महागड्या वस्तू घेऊ नकाय जो खर्च मंजुर करण्यात आला आहे, त्याव्यतिरिक्त बंगल्यावर कोणताही अनाठाई खर्च करू नका असा सल्ला अजितदादांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना दिला आहे. खर्च मर्यादितच ठेवा असे निर्देश अजित दादा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. त्यामुळे आपले बंगले आलिशान बनवतानाच नवीन इंटेरिअरसह नव्या वस्तू खरेदी करण्यावर मात्र आता बंधने आली आहेत. बंगल्यांमध्ये महागड्या वस्तू खरेदी करणाऱ्या मंत्र्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कान उपटले आहेत. मंत्र्यांच्या बंगल्यांच्या खर्चात कपात करा. महागड्या वस्तू खरेदी करू नका. कोणत्याही प्रकारे अनाठायी खर्च करू नका, असा सक्त आदेश अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

असा होणार बंगल्यावर खर्च

शिवनेरी: १ कोटी १७ लाख
अग्रधुत: १ कोटी २२ लाख
ज्ञानेश्वरी: १ कोटी १ लाख
पर्णकुटी: १ कोटी २२ लाख
सेवासदन: १ कोटी ५ लाख
रॉयल स्टोन: १ कोटी ८१ लाख
रामटेक: १ कोटी ४८ लाख

First Published on: February 20, 2020 12:46 PM
Exit mobile version