एसटी चालकाचे नियंत्रण सुटले; लातूरमध्ये भीषण अपघात, ३० जण जखमी

एसटी चालकाचे नियंत्रण सुटले; लातूरमध्ये भीषण अपघात, ३० जण जखमी

लातूर – एसटी बस उलटून ३० प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. लातूर जिल्ह्यातील बोरगावकाळे परिसरात हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात १४ जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

लातूर-पुणे-वल्लभनगर एसटी आगारातून ही बस पुण्याच्या दिशेने निघाली. मुरूडजवळील बोरगाव काळे येथील पुलावर बस आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. एसटी बसचा स्टेअरिंग रॉड अचानक तुटला. त्यामुळे चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावरून खाली उतरत मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन आदळली. त्यामुळे एसटी पुलावरून खाली कोसळली. त्यामुळे प्रवासी जोरात आदळले. बसचा चक्काचूर झाला असून १४ प्रवासी गंभीर जखमी आहेत. जखमींमध्ये ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांचाही समावेश आहे.

लातूर-मुरूड अकोला रस्ता अत्यंत अरुंद असून याठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. यामुळए वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

First Published on: January 17, 2023 1:14 PM
Exit mobile version