ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्या, राजकारण्यांचे बळी ठरु नका, अनिल परबांचे आवाहन

ST Workers Strike :  एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्या, राजकारण्यांचे बळी ठरु नका, अनिल परबांचे आवाहन

एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्या, राजकारण्यांचे बळी ठरु नका, कारण लोकांची गैरसोय होतेय. असे आवाहन परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांनी केली आहे. आज ते माध्यमांशी बोलत होते. संपाच्या बाबतीतील कर्मचाऱ्यांची मागणी कोर्टाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे कोर्टाने नेमलेल्या कमिटीसमोर जाऊन मांडावे लागेल, कारण ते कोर्टाचे आदेश आहे. त्यांच्या आलेल्या रिपोर्टवरती सरकारला कारवाई करायची आहे. त्यामुळे कोर्टाचा आदेश महामंडळाप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू आहे. असं अनिल परब यांनी सांगितले आहे.

कर्मचाऱ्यांच्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यातील सर्व मागण्या जवळपास मान्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यातील बढतीची मागणी सोडून बाकीच्या सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत. त्यामुळे उरलेल्या मागण्यांसंदर्भात काही चर्चा करायची असेल तर संप मागे घेणं गरजेचे आहे. लोकांची गैरसोय चालू ठेवून नये, सरकार चर्चा करायला तयार आहे. परंतु ही पद्धत नाही. कोर्टाने बेकायदेशीर ठरवलेला हा संप आहे संप मागे घ्यावा. आम्ही कालही चर्चेची दारे खुली केली. असंही अनिल परब यांनी सांगितले आहे.

“चर्चेनंतर सदाभाऊ खोतांनी बाहेर जाऊन काही वेगळंच सांगितले”

कालही त्यांच्यासोबत चर्चा केली, काल सदाभाऊ खोत यांना सर्व गोष्टी समजवून सांगितल्या. बाहेर जाऊन त्यांनी काही तरी वेगळंच सांगितलं. आजही त्यांनी आम्ही आज चर्चा करतो असे सांगितले. तर उद्या दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांसोबत चर्चा करु या, माझी आजही चर्चेची तयारी आहे. विरोधी पक्ष चर्चेसाठी आले तर त्यांच्य़ासोबतही चर्चेची तयारी आहे. माझी चर्चेची दारे खुली आहेत. परंतु विरोधकांच्या मनात काय आहे ते माहिती नाही. असंही अनिल परब यांनी सांगितले.

कामगारांना विनंती आहे की, हा प्रश्न जेवढा चिघळत जाईल, तेवढे एसटीचे नुकसान आहे. ज्या वेळेला एसटीचे नुकसान होईल त्यावेळेला एसटी कर्मचाऱ्यांचेही नुकसान होईल. त्यामुळे अतिशय वाईट परिस्थितीत असलेल्या एसटीचं आणखी जास्त नुकसान होऊन देऊ नका, आपण सर्व मिळून यातून मार्ग काढू या. असं वारंवार आवाहन कर्मचाऱ्यांना करतोय. मुख्यमंत्र्यांनीही काल आवाहन केले की, कामगार जर राजकारण्यांचे बळी ठरले तर हे दुर्दैवी म्हणावे लागेल. मी त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र विलनीकरणाची जी त्यांची मागणी आहेत ती १ ते २ दिवसात पूर्ण होणारी नाही याची त्य़ांना जाणीव होणे गरजेचे आहे. नेत्यांनी हे त्यांना समजवून सांगितले पाहिजे. नेते जर त्यांना भडकवतं असतील तर यात एसटी कर्मचाऱ्यांचे दुर्दैवाने नुकसान होईल. असंही परब यांनी स्पष्ट केले.


 

First Published on: November 11, 2021 2:10 PM
Exit mobile version