ST workers strike : एसटी कर्मचाऱ्यांनो आज दिवस अखेर कामावर या… नाहीतर उद्यापासून निलंबन

ST workers strike : एसटी कर्मचाऱ्यांनो आज दिवस अखेर कामावर या… नाहीतर उद्यापासून निलंबन

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या महिन्याभरापासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. मात्र या संपामुळे एसटी सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी कर्मचाऱ्यांना आज २३ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उद्यापासून पुन्हा कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार निलंबन किंवा बडतर्फीची कारवाई होऊ शकते, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात आलीय.

मात्र अद्याप काही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. जोपर्यंत विलिनीकरण नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान एसटी महामंडळाबरोबर झालेल्या बैठकीनंतर संपाची नोटीस देणाऱ्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने सोमवारी संप मागे घेण्याची घोषणा केली.

एसटी कर्मचारी संघटना आणि एसटी महामंडळात झालेल्या बैठीकीत निलंबन, बडतर्फी, सेवा समाप्ती कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या याप्रकरच्या कारवाया मागे घेण्यासंदर्भात चर्चा झाली. दरम्यान निलंबन मागे घेतले जाईल मात्र दोन दिवसांत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हा असे आवाहन एसटी महामंडळाने केलेय.

मात्र आज अंतिम मुदत असतानाही अद्याप काही कर्मचारी कामावर उपस्थित राहण्यास तयार नाहीत. त्यामुळे जे कर्मचारी आज कामावर हजर होणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.


Coronavirus In School: आणखी एका शाळेत कोरोनाचा विस्फोट; २९ विद्यार्थी पॉझिटिव्ह


 

First Published on: December 23, 2021 10:29 AM
Exit mobile version