ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युईटी देण्याचे हायकोर्टाचे आदेश

ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युईटी देण्याचे हायकोर्टाचे आदेश

ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावं; हायकोर्टाचा नवा अल्टिमेटम

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरणासाठी ८ नोव्हेंबरपासून संपावर आहेत. या मुद्द्यावर हायकोर्टात काल सुनावणी पार पडली. यावेळी हायकोर्टाने राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना 15 एप्रिलपर्यंत कामावर रूजू व्हावे असा आदेश दिला होता. परंतु कोर्टाचा हा आदेश राज्यभरातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी वेळ लागेल असे कर्मचाऱ्यांवतीने वकील गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टाला सांगितले. यावर कोर्टाने वेळ वाढवून देत आज पुन्हा सर्व एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे निवृत्तीवेतन, ग्रॅच्युईटी देण्याचे आदेश कोर्टाने सरकारला दिले आहेत. कोर्टाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाला महामंडळाने देखील सहमती दर्शवली आहे, त्यामुळे जवळपास सहा महिन्यांपासून सुरु असलेले संप कर्मचाऱ्यांनी मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे राज्यातील एसटी सेवा आता पुन्हा पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे राज्यभरातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचा कोर्टाचा नवा आणि शेवटचा अल्टिमेटम असणार आहे. त्याचवेळी राज्य सरकारने आणि एसटी महामंडळाने कुठल्याही कर्मचाऱ्यावर कारवाई करू नये असा सुचनाही हायकोर्टाने सरकारला दिल्या आहेत. परंतु 22 एप्रिलनंतरही कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने आदेश दिले की,  कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नका, सर्वांना पुन्हा सामावून घ्या.त्यांनी आंदोलन सुरु केलं तेव्हा परिस्थिती वेगळी होती. मात्र थेट कामावरून काढून टाकत त्यांच्या जगण्याचं साधन कर्मचाऱ्यांपासून हिरावून घेऊ नका.

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर राज्य सरकारने मेस्मा अंतर्गत कारवाई केली होती. मात्र कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्यासाठी तयार असल्याची ग्वाही राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. बुधवारी देखील या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. आज गुरुवारी सकाळच्या सत्रात कर्मचाऱ्यांनी रुजू होण्याची तारीख 15 एप्रिलवरून वाढवून देण्यात आली, यानंतर ही आजही वेळ 22 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.

यावेळी कोर्टाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने लढणारे वकील सदावर्ते गुणरत्न यांना चांगलेच फटकारले आहे, कोर्टाने म्हटले की, ऍड. सदावर्ते न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका, आम्ही आदेश देणार, आम्ही कोणाशी सहमती घेणार नाही, सदावर्ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा, आक्रमक होऊन प्रश्न। सुटत नाहीत.

यावर वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, कर्मचारी दुखवट्यात आहेत, ही युनियन नाही, कर्मचारी वैयक्तिकरित्या लढत आहेत. कर्मचारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान कोर्टाने आज आदेश राखून ठेवला आहे. आज संध्याकाळी आदेश जाहीर केला जाईल,


 

First Published on: April 7, 2022 11:20 AM
Exit mobile version