oxygen supply: ऑक्सिजन वाहतुकीसाठी राज्य सरकार रेल्वेला देणार १ कोटींचा निधी

oxygen supply: ऑक्सिजन वाहतुकीसाठी राज्य सरकार रेल्वेला देणार  १ कोटींचा निधी

oxygen supply: ऑक्सिजन वाहतुकीसाठी राज्य सरकार रेल्वेला देणार १ कोटींचा निधी

राज्यातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी परराज्यातून रेल्वेव्दारे टँकरने ऑक्सिजनचा पुरवठा होत असून या वाहतुकीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून रेल्वे मंत्रालयाला एक कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी टँकर कमी पडत आहेत. त्यासाठी नायट्रोजन आणि आरगाँनची वाहतूक करणाऱ्या टँकरमध्ये आवश्यक ते बदल करून ऑक्सिजन वाहतूक करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

या ऑक्सिजन टँकरमधून परराज्यातून रेल्वे वाहतुकीद्वारे ऑक्सिजन महाराष्ट्रात येत आहे. या ऑक्सिजन वाहतुकीसाठी एक कोटी रुपये आगाऊ देण्याची मागणी रेल्वे मंत्रालयाने केली होती. त्यानुसार ही रक्कम देण्यात येत आहे. रेल्वेच्या माध्यमातून टँकरने ऑक्सिजनजन पुरवठा करण्याचे काम अजून बरेच दिवस चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून परिवहन विभागाला निधी देण्यास विभागाने मान्यता दिली आहे.


Monsoon Good News : यंदा ३१ मे रोजी केरळमध्ये मॉन्सून दाखल होणार – IMD


 

 

First Published on: May 14, 2021 10:19 PM
Exit mobile version