LockDown: लवकरच कोटामध्ये अडकलेले २००० विद्यार्थी महाराष्ट्रात परतणार!

LockDown: लवकरच कोटामध्ये अडकलेले २००० विद्यार्थी महाराष्ट्रात परतणार!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी विद्यार्थी आणि मजुर देशातील इतर राज्यात अडकले आहेत. त्यामुळे इतर राज्य सरकार अडकलेल्या विद्यार्थी किंवा मजुरांना परत राज्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान आयआयटी, मेडिकलच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी कोटा येथे गेलेले महाराष्ट्रातील सुमारे दोन हजार विद्यार्थी लॉकडाऊनमुळे तेथेच अडकले आहेत. इतर राज्यातील सरकारने त्यांच्या विद्यार्थ्यांना परत नेले आहे. त्यामुळे आता कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी ठाकरे सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत राजस्थान सरकारला विनंती पत्र पाठवण्यात आले आहे.

राज्य सरकारने पत्रद्वारे १८०० ते २००० कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सोडवे अशी विनंती राजस्थान सरकारला केली आहे. राज्यात परतल्यावर त्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येईल असे देखील पत्रात नमूद केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विद्यार्थ्यांना पुन्हा राज्यात आणण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी संपर्क साधला आहे. दोन्ही सरकार मिळून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. लवकरच या विद्यार्थ्यांना आणण्यात येईल असे ट्विट पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले होते.


हेही वाचा – आज पंतप्रधान मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार


 

First Published on: April 26, 2020 10:24 AM
Exit mobile version