कोरोना डायलर टोन बंद करण्याची सोप्पी पद्धत, या आहेत स्टेप्स

कोरोना डायलर टोन बंद करण्याची सोप्पी पद्धत, या आहेत स्टेप्स

एखाद्या तातडीच्या क्षणी कुणाला फोन करायचा असल्यास बराचवेळ वाजणारी कोरोनाची डायलर टोन नकोशी वाटते. अनेकदा संपूर्ण डायलर टोन ऐकल्यानंतर समोरच्या व्यक्तीचा फोनच बंद असल्याचं ऐकू येतं. अशावेळी खूप मनस्ताप होतो. मात्र, आता ही कोरोनापासून बचावाची सूचना देणारी डायलर टोन बंद करण्याचा पर्यायदेखील मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी उपलब्ध करून दिलाय. तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करून डायलर टोन बंद करू शकता.

एअरटेल ग्राहक – एअरटेलच्या ग्राहकांना

1. सर्वप्रथम मोबाईलमध्ये *646*224# डायल करावा
2. त्यानंतर Carrier Info या विंडोमध्ये 1 क्रमांक टाकून Send वर क्लिक करा
3. या स्टेपनंतर मोबाईलची कोरोनाची डायरल टोन बंद होईल.

जिओ ग्राहक – जिओच्या ग्राहकांना SMS करावा लागेल. त्यासाठी

1. मेसेजमध्ये जाऊन STOP हा मेसेज टाईप करा
2. हा मेसेज 155223 क्रमांकावर पाठवा
3. तुमची रिक्वेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमची डायलर टोन बंद होईल.

वोडाफोन-आयडीया – वोडाफोनच्या ग्राहकांना डायरल टोन बंद करण्यासाठी SMS पाठवावा लागेल. त्यासाठी सर्वप्रथम

1. मेसेजमध्ये CANCT टाईप करा
2. हा मेसेज 144 क्रमांकावर पाठवा
3. त्यानंतर काही वेळात तुम्हाला डायलर टोन बंद झाल्याचा मेसेज येईल.

बीएसएनएल ग्राहक – या ग्राहकांना मेसेज पाठवून डायरल टोन बंद करता येईल. त्यासाठी

1. मेसेजमध्ये जाऊन UNSUB मेसेज टाईप करा
2. टाईप केलेला मेसेज 56700 क्रमांकावर पाठवा
3. रिक्वेस्ट पूर्ण झाल्यानंतर डायरल टोन बंद होईल.

First Published on: September 17, 2021 10:53 PM
Exit mobile version