महाराष्ट्र-कर्नाटक वाद; एसटीवर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक

महाराष्ट्र-कर्नाटक वाद; एसटीवर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक

STची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी घेतला महत्त्वाचा निर्णय

महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा एकदा चिघळल्याचे समोर आले आहे. कोल्हापुरात याची ठिंणगी उडाली असून एका कर्नाकटमधील व्यक्तीने महाराष्ट्र एसटी बसवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात ही घटना घडल्याने आता दोन्ही राज्याकडून एसटीची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

बेळगावमध्ये कन्नड रक्षण विदिकेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्या दरम्यान कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवरील झेंडा काढून कारची तोडफोड करण्यास सुरुवात केली. दरम्यान, याच घटनेचे पडसाद कोल्हापुरात उमटले. त्यानंतर कोल्हापुरातील शिवसैनिकांनीही देखील आक्रमक पवित्रा घेत कोल्हापुरात बस स्थानकावर आंदोलन केले. यावेळी त्यांनी कर्नाटक राज्याची बससेवा बंद केली. तर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत कन्नड संघटनेच्या आंदोलनाला प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आज सकाळी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात महाराष्ट्राच्या बसवर एका अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा एकदा चिघळला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.


हेही वाचा – जगाचा निरोप घेण्याची वेळ आलीय, सचिन वाझेंचे धक्कादायक व्हॉट्सअॅप स्टेटस


 

First Published on: March 13, 2021 2:29 PM
Exit mobile version