Strict Lockdown: बारामती, सांगली, साताऱ्यात कडक लॉकडाऊन, लोक नियम पाळत नसल्याने निर्णय

Strict Lockdown: बारामती, सांगली, साताऱ्यात कडक लॉकडाऊन, लोक नियम पाळत नसल्याने निर्णय

Strict Lockdown: बारामती, सांगली, साताऱ्यात कडक लॉकडाऊन, लोक नियम पाळत नसल्याने निर्णय

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. कोरोना प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. परंतु काही जिल्ह्यात नागरिक नियमांचे पालन करत नसल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. बारामती, सांगली, सातारा आणि अहमदनगरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आणि कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे पुढील ७ दिवस अधिक कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामध्ये मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व दुकाने, अस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि मृत्यूदर आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

बारामतीमध्ये बुधवार ५ मे रोजी पासून हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. कोरोना नियमांचे नागरिक पालन करत नसल्याने जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होते. अजित पवारांनी घेतलेल्या आढावा बैठीत वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर चिंता व्यक्त केली होती. तसेच कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला होता.

बारामतीमध्ये सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत दूध विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच मेडिकल आणि दवाखाने सोडून सर्व दुकाने आणि अस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बाजारही या ७ दिवसांमध्ये बंद ठेवण्यात येणार आहेत. सांगलीमध्ये मेडिकल, दूध विक्रीवगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या तर सकाळी ११ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची प्रचंड रुग्णवाढ झाली आहे. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूदरात वाढ झाली आहे. सध्याच्या लॉकडाऊनचे नियम लोक पाळत नाही आहेत. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला देखील नागरिकांनी केराची टोपली दाखवली आहे. जिल्ह्यात दररोज २० रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. त्यामुळे आता प्रशासनाने ७ दिवसांचा कडक लॉकडाऊन केला आहे.

First Published on: May 3, 2021 6:33 PM
Exit mobile version