सावित्रीबाई फुले घरकुल योजनेचा प्रस्ताव सादर करा; विजय वडेट्टीवार यांचे निर्देश

सावित्रीबाई फुले घरकुल योजनेचा प्रस्ताव सादर करा; विजय वडेट्टीवार यांचे निर्देश

विमुक्त जाती, भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी दिले.

आज मंत्रालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविण्याबाबत वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इतर मागास प्रवर्ग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार, वित्त विभाग, नियोजन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

विमुक्त जाती, भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गाकरिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविण्याबाबत सन २०२१-२२ या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली आहे.तसेच अन्न,नागरी पुरवठा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमितीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना ही स्वतंत्र योजना राबविण्याची शिफारस केलेली आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

सध्या विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यात येत असल्याने विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गाकरिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. याकरिता विभागाने या योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा. असे निर्देश विजय वडेट्टीवार यांनी बैठकीत दिले.

 

First Published on: April 6, 2022 8:48 PM
Exit mobile version