रायते पाणीपुरवठा योजनेच्या कामामुळे पाणी रोखण्यात यश

रायते पाणीपुरवठा योजनेच्या कामामुळे पाणी रोखण्यात यश

कल्याण तालुक्यातील उल्हास नदीच्या काठावर असलेल्या रायते पाणीपुरवठा योजनेतून वर्षानुवर्षे वाया जाणारे पाणी अखेर कल्याण पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने दुरुस्ती करून रोखले आहे. त्यामुळे पाण्याची बचत झाली आहे.
कल्याण तालुक्यात तीन सरकारी पाणी योजना कार्यरत होत्या. यामध्ये रायते प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, दहागाव पाणीपुरवठा योजना आणि खडवली पाणी पुरवठा योजना याचा समावेश आहे. यापैकी खडवली आणि दहागाव या योजना ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आल्या. परंतु रायते पाणीपुरवठा योजना अद्यापही शासकीय योजना म्हणून सुरू आहे.

तालुक्यातील 17 गावे आणि वाड्या वस्त्या साठी सन 1971 साली उल्हास नदीच्या काठावर ही योजना सुरू करण्यात आली. 26 जुलै 2005 च्या महापुरात या योजनेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यातून कसेबसे सावरत आज ही योजना एक ते दीड लाख नागरिकांना पाणी देत आहे. परंतू साठवण टाकी आणि इनटेक वेल अनेक वर्षेपासून लिकेज होते. यामुळे नदीच्या पात्रातील विहिरीतून पाणी टाकीत व गळतीमुळे तेच पाणी पुन्हा नदीत असे सुरू होते. ही बाब कल्याण पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे इंजिनिअर गहाणे यांच्या लक्षात आले. त्यांनी या बाबतीत वरिष्ठांना दाखवून हे थांबवून दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानुसार सुमारे 20/25 लाखांचे अंदाज पत्रक तयार करून पावसाळ्यापूर्वी नदीच्या पात्रातील विहिरीच्या सर्व बाजूंनी सिमेंट गोण्या टाकून पाणी अडवून या विहिरीतील गळती थांबविली. तसेच साठवण टाकी व इनटेक वेल दुरुस्ती केली. आता तरी पाणी साठवण क्षमता वाढणार आहे.

First Published on: June 18, 2020 2:30 AM
Exit mobile version