निरुपम यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार- मुनगंटीवार

निरुपम यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार- मुनगंटीवार

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

अवनी वाघिणीच्या शिकारीवरून काँग्रेस मुंबई अध्यक्ष संजय निरुरपम यांनी वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्यावर आरोप केले होते. या आरोपांना मुनगंटीवार यांनी प्रत्योत्तर दिले आहे. संजय निरुपम यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना त्यांनी हे सांगितले.

काय म्हणाले मुनगंटीवार

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी तस्करांसोबत जोडलेले माझे संबंध म्हणजे राजकीय हिनता आहे. इतक्या खालच्या स्तराला जाऊन तथ्यहीन आरोप मी आजवर राजकीय आयुष्यात बघितले नाही. सत्याचा निर्घृण खून निरुपम यांनी केला आहे. कोणतेही पूरावे नसताना संजय निरुपम हे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाची बदनामी करत आहे. माझ्या कार्यकालात फक्त एक वाघिण ठार मारली गेला.

First Published on: November 10, 2018 2:53 PM
Exit mobile version