अधिवेशन १४ दिवसांचे झाल्यास तेरवीचा कार्यक्रम होण्याची ठाकरे सरकारला भीती – सुधीर मुनगंटीवार

अधिवेशन १४ दिवसांचे झाल्यास तेरवीचा कार्यक्रम होण्याची ठाकरे सरकारला भीती – सुधीर मुनगंटीवार

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत पावसाळी अधिवेशनाबाबत चर्चा करण्यात आली परंतु राज्य सरकारने पावसाळी अधिवेशन २ दिवसांचे ठेवण्याचा प्रस्वात ठेवल्यामुळे विरोधी पक्षांनी आक्रमक होऊन सभात्याग केला आहे. राज्य सरकारने २ दिवसांचे पावसाळी अधिवेशन करण्याचं ठरवल्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विरोध केला आहे. राज्य सरकारला अधिवेशनाची भीती वाटत आहे. १४ दिवसांचे अधिवेश ठेवले तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकतो अशी भीती महाविकास आघाडीला वाटत आहे. अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीचा त्याग केल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, ठाकरे सरकारला भीती वाटत आहे. ४ दिवसांचे अधिवेशन झालं तर हायड्रोजन बॉम्बसारखा स्फोट झाला. ज्या सचिन वाझेची विना फीची वकिली करत होते तो सचिन वाझेच यांच्यावर उलटला. म्हणून राज्य सरकारला वाटत आहे की, १४ दिवसांचे अधिवेशन झालं तर तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकतो असा टोलाच सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

यांना सत्तेची चटक लागली

महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळाचा नारा देत आहेत. विधनसभा अध्यक्षाची निवड झाली नाही असा प्रश्न करण्यात आल्यावर मुनंगीटावार यांनी म्हटलयं की, राज्य सरकारमध्ये नाराजी येऊ शकत नाही. कारण एकदा सत्तेची चटक लागली की नाराजी फक्त दोन दिवसांची असते. जेव्हा १९ जूनला राहुल गांधींचा वाढदिवस होता त्या दिवशी केक खाऊ घालायचे त्याच दिवशी जोड्याने मारायची भाषा झाली. परंतु यांच्याकडे आम्ही पात नाही तर जनता नाराज राहू नये ही आमची भूमिका असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

कार्यालयांच्या उद्घाटनाला हजारोंची गर्दी चालते पण..

राज्यात अधिवेशन जवळ आले की, कोरोना रुग्णांचे आकडे वाढतात. कोरोनाचे कारण देऊन अधिवेशन टाळण्याचं सरकारचा प्रयत्न सुरु आहे. राज्यात हजारोंच्या संख्येने पक्ष कार्यालय उद्घाटन चालतं पण अधिवेशन का चालत नाही? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महाविकास आघाडीकडून लोकशाहीची थट्टा सुरु असल्यामुळे सभात्याग केला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

First Published on: June 22, 2021 3:30 PM
Exit mobile version