राज ठाकरेंचा मला फोन, मी त्यांची भेट घेणार, मुनगंटीवार यांच्या विधानामुळे भाजप-मनसे युतीची चर्चा

राज ठाकरेंचा मला फोन, मी त्यांची भेट घेणार, मुनगंटीवार यांच्या विधानामुळे भाजप-मनसे युतीची चर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मलाही फोन केला होता त्यांना ऑगस्टमध्ये पहिल्या आठवड्यात भेटणार असल्याचे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजप-मनसे युतीची चर्चा पुन्हा जोर धरु लागली आहे. काही दिवसांपुर्वी राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट झाली होती. राज ठाकरे-चंद्रकांत पाटील यांच्यात गप्पा होत असताना दोघांचेही स्मितहास्यचे हावभाव होते. नाशिक महापालिका निवडणूकीमध्ये भाजप-मनसे युती होणार का? अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोन केला असल्याचे म्हटलं आहे. तसेच येत्या काही दिवसांत म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. सारख्या विचाराचे पक्ष एकत्र येऊन काम करत असतील तर त्यामध्ये गैर काय? भविष्यात जर काँग्रेस सोडून कोणताही पक्ष भाजपसोबत काम करु शकतो असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. मुनगंटीवार यांच्या वक्तव्यामुळे भाजप आणि मनसे युती होणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

चंद्रकांत पाटील यांची राज ठाकरेंशी भेट

भाजप प्रदेशाध्यक्ष आणि राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना दोघांचीही वाहन पार्किंग तळ मध्ये भेट झाली होती. यावेळी राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बराच वेळ चर्चा रंगली होती. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या परप्रांतियांविषयी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचे सांगितले होते. तसेच काही व्हिडिओही राज ठाकरे पाठवणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनीही भाजप-मनसे युतीची चर्चा सुरु केली होती. सर्वांना आम्ही मान देऊ शकतो तर राज ठाकरे मोठं नेतृत्व आहे. यामुळे राज ठाकरेंबाबत भाजप कोअर टीम निर्णय घेईल असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

First Published on: July 26, 2021 5:18 PM
Exit mobile version