…तरीही आघाडीला काहीही फरक पडणार नाही – राजू शेट्टी

…तरीही आघाडीला काहीही फरक पडणार नाही – राजू शेट्टी

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी आज दुपारी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुजय पाटील भाजपात गेल्याने आघाडीला काहीही फरक पडणार नाही, असे राजू शेट्टी म्हणाले आहेत.

मागण्या मान्य न झाल्यास १६ जागांवर निवडणूक लढवणार

खासदार राजू शेट्टी म्हणाले की, ‘गेल्या दहा वर्षांपासून हातकणंगलेची जागा ही आमच्या ताब्यात आहे. त्यामुळे आघाडीने ती जागा आम्हाला देत असल्याचं सांगू नये. वर्धा आणि बुलढाणा या ठिकाणीही स्वाभिमानीला जागा मिळावी. आम्ही यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दोन दिवसांची मुदत दिली आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीतर आम्ही १६ जागांची यादी जाहीर करु.’ यावेळी राजू शेट्टी यांनी बुलढाणा येथून रविकांत तुपकर, वर्ध्यातून सुबोध मोहिते हे उमेदवार असतील असे स्पष्ट केले.

माढाची जागा हवी

राजू शेट्टी यांनी माढा मतदारसंघाच्या जागेचीदेखील मागणी केली आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, ‘माढा मतदारसंघातून शरद पवार लढवणार होते. त्यामुळे त्या जागेची मागणी आम्ही केली नव्हती. मात्र आता ते लढवणार नसल्याने आम्ही त्या जागेची मागणी करत आहोत.’

First Published on: March 12, 2019 5:27 PM
Exit mobile version