मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक, जाणून घ्या काय आहे वेळापत्रक?

मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक, जाणून घ्या काय आहे वेळापत्रक?

नाताळ आणि रविवार एकत्र आल्याने तुम्ही आज घराबाहेर पडण्याच्या विचारात असाल तर आधी खाली दिलेले वेळापत्रक जरूर वाचा. कारण विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांत मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत ब्लॉक असणार आहे.

ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे योग्य डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.

सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ या वेळेत घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील. वडाळा रोड- मानखुर्द अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वांद्रे/गोरेगाव सेवा प्रभावित होणार नाही).

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.४० ते दुपारी ३.२८ पर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.५४ वाजेपर्यंत सुटणाऱ्या पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.


ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वांद्रे/गोरेगाव दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.३० पर्यंत ट्रान्सहार्बर/मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल – मानखुर्द या मार्गावर विशेष उपनगरीय गाड्या धावतील.


हेही वाचा : राज्य सरकारकडून सेलिब्रेशन, तर केंद्राकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना


 

First Published on: December 25, 2022 7:30 AM
Exit mobile version