राऊतांच्या घरी सापडेल्या दहा लाखांच्या कॅशवर शिंदेंचे नाव?, सुनील राऊत म्हणाले…

राऊतांच्या घरी सापडेल्या दहा लाखांच्या कॅशवर शिंदेंचे नाव?, सुनील राऊत म्हणाले…

Sunil Raut

1200 कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात 17 तास चौकशी केल्यानंतर ईडीने खासदार संजय राऊत यांना अटक केली. शिवसेनेची बाजू मांडून भाजपच्या नेत्यांविरोधात आवाज उठवण्याचे काम संजय राऊत गेल्या अडीच वर्षात केले. दरम्यान संजय राऊत यांच्या घरी सापडलेल्या दहा लाख रुपयांच्या रोख रकमेप्रकरणी त्यांनी खळबळजनक माहिती दिली आहे.

ते पक्षाचे पैसे –

मी संजय राऊत यांना भेटलो, ते ओके आहेत, बिनधास्त आहेत. त्यांना काही टेन्शन किंवा भीती नाही. दहा लाखांची जी कॅश सापडली, त्याच्यावर ज्यांनी ताबा घेतला, त्यावेळी लिहिले होते अयोध्या आणि एकनाथ शिंदे. ते अयोध्याला गेले होते, त्याचे काँट्रिब्युशन होते, ते पक्षाचे पैसे आहेत आणि पक्ष कार्यालयात जमा होणार होते. आम्ही न्यायालयीन लढाई लढणार. तुम्ही रामायण-महाभारत बघा, सत्याचाच विजय होतो. संजय राऊत यांना काही दिवसात न्याय मिळेल, भाजप राऊतांना घाबरली म्हणून अटक केली, असा गंभीर आरोपही सुनील राऊत यांनी केला.

जेजेमध्ये होणार वैद्यकीय चाचणी –

सगळ्या बोगस केस कागदावर आणल्या आहेत. पूर्वी ज्या केसच्या चौकशीसाठी संजय राऊत यांना बोलावलेले होते, त्याच्या खोट्या केस बनवून अटक दाखवण्यात आली आहे. सकाळी साडेनऊ-दहा वाजताच्या सुमारास त्यांना जेजेमध्ये वैद्यकीय चाचणीसाठी नेतील, तर साडेअकरा बाराला कोर्टात हजर करतील, अशी माहिती सुनील राऊत यांनी दिली.

पत्राचाळ प्रकरणाशी काहीही संबंध नाही – सुनील राऊतां

पत्राचाळ प्रकरणाशी काहीही संबंध नाही, एक टक्काही नाही, संजय राऊत यांना कागदपत्र वाचून दाखवण्यात आली, की कशात अटक करण्यात आली आहे, त्यात याचा उल्लेख नसावा. ५० लाखाच्या एन्ट्री आणि काहीतरी बोगस केस फाईल बनवून अटक केली आहे, असेही सुनील राऊतांनी सांगितले.

First Published on: August 1, 2022 8:20 AM
Exit mobile version