“…तंबाखू चोळता चोळता म्हणाले”, सुषमा अंधारेंची मिश्किल टीका

“…तंबाखू चोळता चोळता म्हणाले”, सुषमा अंधारेंची मिश्किल टीका

मुंबई | “शंभूराज देसाई तंबाखू चोळता चोळता म्हणाले, सभेला गर्दीच जमणार नाही. किशोर आप्पा, उदय भाऊ, शंभूराज देसाई यांनी स्वत: यावे आणि खुर्चा मोजाव्यात”, अशी मिश्किल टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिंदे गटावर केली आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) जळगावच्या सभेत गर्दी जमणार नाही, अशी टीका शिंदे गटाकडून होत हीती. यावर सुषमा अंधारेंनी जळगावातील पाचोऱ्यात सभेत पालमंत्री गुलबराव पाटील, राज्याचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील,  उदय भाऊ या नेत्यांवर हल्लाबोल केला.

सुषमा अंधारे म्हणाले, “किशोर आप्पा मारु नका विनाकारण गप्पा कारण तुमच्यावर लागला आहे गद्दारीचा ठपका. ते असे म्हणाले की, या खूर्च्या २५ हजारच आहेत. उदय भाऊ म्हणाले ८ हजार खुर्च्या आहेत. आणि ते ८० हजार सांगितील. मग, तंबाखू चोळणारे शंभूराज देसाई तंबाखू चोळता… चोळता म्हणाले. सभेला गर्दीच होणार नाही. सभागृहात एकमेकांना तंबाखूची देवाण-घेवाण करणारे शंभूराज देसाई तंबाखू चोळण्यात व्यस्त आहेत. ज्यांना शंका आहे, त्या किशोर आप्पा, उदय भाऊ, शंभूराज देसाई यांनी स्वत: यावे आणि खुर्चा मोजाव्यात. आम्ही सभ्य आणि सज्जन माणसे आहोत. आम्ही खुर्चा मोजताना त्यांना अडवणार नाही,” अशी मिश्कील टीका त्यांनी भर सभेत केली.

पालकमंत्री बालकमंत्र्यासारखे वागत असतील तर…

“गुलाबराव पाटील यांचा महाप्रबोधन यात्रेत मी नाकावर टिच्चून चार सभा घेतल्या होत्या. पाचवी सभा घेऊ न देण्याचा प्रयत्न केला. पण, ऑनलाईन २५ लाख लोकांनी ती सभा पाहिली. पालकमंत्र्यांनी संविधानाचे पालन करुन बोलावे. पण, बालीश विधाने करणाऱ्या पालकमंत्र्याला कसे कळेल. त्यामुळे आम्ही ज्यांना पालमंत्री म्हणतोय, ते जर बालकमंत्र्यासारखे वागत असतील तर त्याच्याकडून काय अपेक्षा करायच्या,” अशी बोचरी टीका सुषमा अंधारेंनी केली आहे. “अजित पवार यांच्याबद्दल चुकीची माहिती पसरवण्यात आली होती. पण, याबाबतच्या बातम्या समोर आल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. यावेळी भाजपचे हिंदुत्वाच्या नावाने बेगडी प्रेम दिसून आले होते”, असे त्या म्हणाल्या.

 

 

First Published on: April 23, 2023 8:32 PM
Exit mobile version