‘तबलिगी जमात पर गर्व है’; ट्विटर ट्रेंड व्हायरल

‘तबलिगी जमात पर गर्व है’; ट्विटर ट्रेंड व्हायरल

दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमातून अनेक तबलिगी जमातीच्या मुस्लिम बांधवांना कोरोनाची लागण झाल्याने या समाजावर देशभरातून संताप व्यक्त झाला. तसेच राजकारणही मोठ्या प्रमाणात रंगले. पण आता कोरोनाविरोधातला लढा दिलेल्या तबलिगी जमातीच्या बांधवांनी देशासमोर एक उत्तम उदाहरण सादर केले आहे. देशभरात कोरोनावर उपचार घेतल्यानंतर आता ही तबलिगी जमात अनेक ठिकाणी प्लाज्मा दान करण्यासाठी अनेक हॉस्पिटलमध्ये पुढे येत आहे. त्यामुळेच त्यांच्या या पुढाकाराबाबत ट्विटरवरही मोठे कौतुक करण्यात येत आहे. आज दिवसभर #तब्लीगी_जमात_पर_गर्व_है हा ट्रेंड पहायला मिळाला. सव्वा लाख ट्विटर युजर्सने तबलिगी जमातीने घेतलेल्या पुढाकारासाठी ट्विट्स केले आहेत. त्यामध्येही तबलिगी जमातीवर विरोध आणि टीका करणाऱ्या ट्विट्सचाही समावेश आहे.

कोरोनाच्या प्लाझ्मा उपचारासाठी कोरोनाविरोधात उपचार घेतलेल्या रूग्णाच्या प्लाझ्माची गरज असते. समाजासाठीची एक मदत म्हणून या तबलिगी जमातीकडून एका हॉस्पिटलच्या बाहेर सोशल डिस्टन्सिंग ठेवत प्रतिक्षेत असलेल्या लोकांचा फोटो ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला आहे. त्यासोबतच #तब्लीगी_जमात_पर_गर्व_है हा हॅशटॅगदेखील मोठ्या प्रमाणात वापरण्यात आला आहे. अनेक ट्विटर युजर्सने पवित्र कुराणातील दाखले देत हा हॅशटॅग फोटोसह टॅग केला आहे. काही ट्विटर युजर्सने मशीदीत क्वारंटाईनची व्यवस्था केलेले फोटोदेखील ट्विट केले आहेत. आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा वापर चाचणीसाठी करा अशा आशयाच्या बातम्यादेखील मोठ्या प्रमाणात ट्विट करण्यात आल्या आहेत. तर #तब्लीगी_जमात_पर_गर्व_है हा ट्रेंड वापरण्यासाठीचे आवाहनदेखील ट्विटर युजर्समार्फत करण्यात आले आहे.

तबलिगी समाजाच्या कार्यक्रमाविरोधात टिका करत अनेक जणांनी आता प्लाझ्मा देण्याच्या पुढाकारावरही ट्विटरवर टीका केली आहे. नर्सेससोबतचे गैरवर्तन, लॉकडाऊननंतरही करण्यात आलेला प्रवास यामुळे अनेकांनी समाजालाच सरसकटपणे टार्गेट केले आहे. तर लॉकडाऊन न संपण्यासाठीही या समाजावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. तर काही ट्विटर युजर्सने प्लाझ्मा देण्याच्या गोष्टीचे मोठ्या मनाने कौतुकही केले आहे.

First Published on: April 27, 2020 11:06 PM
Exit mobile version