राज्यात थंडीची चाहूल

राज्यात थंडीची चाहूल

परतीच्या पावसामुळे राज्याला थंडीने हुलकावणी दिली असताना कालपासून राज्यातील काही भागात थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. गेल्या दोन दिवसापासून राज्यातील किमान तापमानात घट होत होतानाचे चित्र आहे. पहाटेच्या वेळी पडणारे धुके, दव यामुळे तापमान घसरु लागले आहे. काल नगरमध्ये तापमान १४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र गारठले

देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये देखील थंडीचा कडाका जाणवू लागले आहे. मध्य आणि पश्चिम भारतातून थंड वारे वाहू लागले आहे. त्यामुळे येत्या दिवसात राज्यातील किमान तापमानात आणखी २ ते ४ अंशांनी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रविवारी मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तापमानाचा पारा २० अंशांवर होता. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही भागातील तापमानात वेगाने घट होत असल्याने थंडी जाणवू लागली आहे. पुणे शहरात सुद्धा सोमवारी १६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती.

First Published on: November 12, 2019 10:46 AM
Exit mobile version