राज्यात उष्णतेची लाट; मुंबईकरांना उन्हाचा तडाखा तर जळगावमध्ये उष्मघाताने एकाचा मृत्यू

राज्यात उष्णतेची लाट; मुंबईकरांना उन्हाचा तडाखा तर जळगावमध्ये उष्मघाताने एकाचा मृत्यू

मुंबई | गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात (Maharashtra) उष्णतेची लाट पसरलेल्याची माहिती हवामान विभागाने (India Meteorological Department) दिली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा ४३ अंशाच्यावर पोहोचला आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा मुंबईचे (Mumbai) तापमान ३५.२ एवढे नोंदवले आहे तर, गुरुवारी मुंबईचे तापमान ३६.९ तुलनेत शुक्रवारी कमी नोंदविले गेले. या वाढत्या तापमानामुळे मुंबईकरांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागला. तसेच मुंबईच्या हवेत प्रचंड आर्द्रता असलायमुळे मुंबईकरांचा घाम काढला.

दरम्यान, मुंबई जवळचे पालघर, रायगड, ठाणे जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात चक्रवातविरोधी स्थिती निर्माण झाली असून ती आता हळूहळू उत्तर दिशेने सरकरत आहे. यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत शहराचे तापमान १ ते २ अंशाने कमी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई वेधशाळेचे संचालक सुनील कांबळे यांनी दिली आहे.

राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये ४० अंशापेक्षा अधिक तापमान शुक्रवारी नोंदविले गेले होते तर, समुद्रकिनाऱ्या जवळच्या जिल्ह्यात ३७ अंश तापमान ओलांडल्यानंतर वेधशाळेने उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. कारण, समुद्रकिनारच्या जिल्ह्यांमध्ये तापमान ३७ अंश नोंदविले. मुंबई शहरात शुक्रवारी हवेती आर्द्रतेचे प्रमाण ७९ टक्के नोंदविले.

जळगावामध्ये उष्मघाताने मृत्यू

राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४३ अंशांच्यावर पोहोचली आहे. मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाल्याने हवामान खात्याने पुढील तीन दिवस नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले असून जळगाव येथील अमळनेरमध्ये एका महिलेचा उष्मघातामुले मृत्यू झाल्याची माहितीसमोर आली आहे. यामुळे जळगावात उष्मघातामुळे पहिला बळी गेला आहे. रुपाली राजपूत असे या महिलेचे नाव आहे. रुपाली ही एक विवाह समारंभासाठी अमरावतीत गेल्या होत्या. यावेळी घरी परतत असताना रुपालींना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेले. तेव्हा डॉक्टरांनी रुपालींना मृत घोषित केले आणि शवविच्छेदनाच्या अहवानातून रुपाली यांचा उष्मघातामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती मिळाली आहे.

 

First Published on: May 13, 2023 12:55 PM
Exit mobile version