उष्ण लहरींमुळे नागरिक घामाघूम

उष्ण लहरींमुळे नागरिक घामाघूम

उन्हाचा पारा वाढला

कोरड हवामान आणि कमी उंचीवरुन वाहणारे वारे यामुळे हिवाळा संपून उन्हाळा सुरु झाल्याचे संकेत वेधशाळेने दिले आहेत. राज्यातील बहुतांश शहरांमध्ये तापमान ३५ अंशाच्या पलीकडे गेले आहे. मागील आठ दिवसांपासूनच राज्यातील उन्हाचा पारा चढू लागला आहे. राज्यातील चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ३९.६ इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये देखील तापमान ३२.४ अंश सेल्सिअस पर्यंच पोहोचले असून, दुपारच्या उन्हात फिरणाऱ्यांना घामाच्या धारा सुरु झाल्या आहेत. राज्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये ३२.७ इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. साधारणपणे मार्च महिन्यात होळीच्या सणा नंतर तापमान वाढायला सुरवात होते. त्यामुळे पुढील काही दिवसात तापमानामध्ये कमालीची वाढ होईल.

या शहार तापमान सर्वाधिक

होळी पर्यंत उष्णतेचा दाह काहीसा सामान्य राहील असा अंदाज वेध शाळेने वर्तवला आहे. चंद्रपूर पाठोपाठ ब्रम्हपूरी येथे ३९.४, सोलापूर येथे ३९.१ इतक्या तापामानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मराठवाड्यात उस्मानाबाद, नांदेड, परभणी या ठिकाणी तापमान ३७ ते ३९ अंशापर्यंत राहील. तर औरंगाबादमध्ये तापमान ३५.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. पुण्यात तापमानाचा पारा ३६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आला आहे. पुढील अठवडाभर वातावरण कोरडे राहणार असून तापमानाचा पारा स्थिर राहणार असल्याचे वेध शाळेने सांगितले आहे.

उन्हाळ्यात घ्यायची काळजी

उन्हाळा सुरु झाल्यावर वातावरणातील बदलामुळे अनेक आजार उदभवतात. उष्माघात, घामाने शरिरातील पाणी कमी होऊन चक्कर येणे, उष्माघात यांसारखे आजार उदभवतात. त्यामुळे उन्हाळ्यात शरिराचे तापमान सामान्य ठेवणे गरजेचे असते.
१.त्यामुळे ताहान लागली नसली तरी दर एक तासाला थोडे-थोडे पाणी प्यावे.
२. दुपारच्या उन्हात अगदीच महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे, अन्यथा घराबाहेर पडणे टाळावे.
३. बाहेर पडलातच, तर टोपी, रुमाल, गॉगल, छत्रीचा वापर करावा.
४. उन्हाळ्यात उसाचा रस, लस्सी, लिंबू पाणी यांसारखी शितपेय प्यावी.
५. गडद रंगाचे कपडे घालने टाळावे, शक्यतो सफेद, सुती रंगाचे कपडे परिधान करावे.

 

 

First Published on: March 16, 2019 4:52 PM
Exit mobile version