दिग्दर्शकाला मारहाण करणारे दहा जण पोलिसांच्या ताब्यात

दिग्दर्शकाला मारहाण करणारे दहा जण पोलिसांच्या ताब्यात

मुळशी पॅटर्न चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे

गुन्हेगारांचे माहेरघर अशी ओळख असलेल्या मुळशी गावावर आधारित ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील ‘अराररा खतरनाक‘ या गाण्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या गाण्यात खरोखरच्या स्थानिक गुंडाचा समावेश होता. अशातच संदीप मोहोळ खुनातील गुंड गणेश मारणे आणि त्याच्या टोळीतील १० जणांना शिवाजीनगर न्यायालय परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

स्थानिक गुंडानीही केली होती भूमिका

मुळशी पॅटर्न हा सिनेमा पुण्यातील मुळशी परिसरातील गुन्हेगारी विश्वावर आधारित असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण मुळशी तालुक्यातील काही गावात चित्रित करण्यात आले आहे. चित्रपटातील काही प्रसंगात स्थानिक गुंडाच्याही भूमिका आहेत. या चित्रपटामुळे गुन्हेगारांचे उदात्तीकरण होत असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे शहर आणि मुळशी परिसरातील गुन्हेगारी स्वरूपाच्या हालचाली वाढण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी गुन्हेगारांची झाडाझडती सुरू केली आहे. मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात काही स्थानिक गुन्हेगारांनी देखील भूमिका केली आहे. काही सिन्स हे प्रत्यक्षात घडलेल्या घटना असल्याने या गुन्हेगारांना सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांना ताब्यात घेतले आहे.

ताब्यात घेतलेल्यांची नावे

संदीप मोहोळ खून प्रकरणाचा खटला शिवाजीनगर न्यायालयात सुरू आहे. या खून प्रकरणातील आरोपी गणेश मारणे, अनिल खिलारे, इंद्रनील मिश्रा, रहीम शेख, संतोष लांडे, शरद विटकर, संजय कानगुडे, विजय कानगुडे, निलेश माझीरे आणि दत्ता काळभोर हे तारखेसाठी न्यायालयात गेले होते. त्यावेळी या सर्वांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

First Published on: November 18, 2018 7:50 PM
Exit mobile version