अनिल परब यांचा रिसॉर्ट पाडण्याकरता निविदा जारी, बांधकाम विभागाने वेळही केली निश्चित

अनिल परब यांचा रिसॉर्ट पाडण्याकरता निविदा जारी, बांधकाम विभागाने वेळही केली निश्चित

रत्नागिरी – माजी मंत्री अनिल परब यांचं दापोलीतील रिसॉर्ट पाडण्याचं काम जवळपास पूर्ण होत आलं आहे. चिपळूणच्या बांधकाम विभागाने याबाबत स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात दिली आहे. या जाहिरातीत रिसॉर्ट पाडण्याचा कालावधी तीन महिने ठेवण्यात आला आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनिल परब यांचा रिसॉर्ट लवकरच जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. भाजपा नेते किरिट सोमय्या यांनीही याबाबत त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे.

हेही वाचा – बाबो! अनिल परबांचा ६ कोटींचा रिसॉर्ट पाडण्यासाठी १ कोटीचा खर्च

पर्यावरणीय नियमांचा भंग करून अनिल परब यांनी रिसॉर्ट बांधला असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. तसंच, हा रिसॉर्ट बांधण्यासाठी कोरोना काळात अफरातफर केल्याचाही दावा करण्यात येत आहे. त्यामुळे हा रिसॉर्ट पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

चिपळूणच्या बांधकाम विभागाकडून या पाडकामाची निविदा काढण्यात आली आहे. यामध्ये इमारतीची भिंत, कंपाऊंड वॉल, पोचरस्ता, एनएक्सचे बांधकाम पाडण्याचं नमूद करण्यात आलं आहे. या निविदेबाबत वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आली आहे. या कामासाठी ४३ लाख २९ हजार ८ रुपये ठरवण्यात आली आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर लवकरच अनिल परब यांचा रिसॉर्ट पाडण्यात येणार आहे.

First Published on: October 22, 2022 2:45 PM
Exit mobile version