राज्यपालांचे चार्टर्ड फ्लाईट ठाकरे सरकारकडून रद्द, सरकार – राज्यपालांमधील वाद चिघळला

राज्यपालांचे चार्टर्ड फ्लाईट ठाकरे सरकारकडून रद्द, सरकार – राज्यपालांमधील वाद चिघळला

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकार यांच्यातील वाद संपण्याचे नावच घेत नाही असेच गुरूवारच्या घटनेच्या माध्यमातून समोर आले आहे. आज गुरूवारी घडलेल्या घटनेत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर चार्टर्ड विमानातून खाली उतरण्याची नामुष्की ओढावली. महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारचे ही पहिलीच घटना असून आता यापुढे राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वाद चिघळणार हे आता निश्चित आहे. राजभवनावरून वारंवार मुख्यमंत्री कार्यालयाशी याबाबतीत संपर्क साधण्यात येत होता. मात्र राज्यपाल कोश्यारी यांनी एकदा तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चार्टर्ड फ्लाईटबाबतीत बोलावे असे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांनी राजभवनावर निरोप दिला होता. मात्र कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क न केल्याने अखेर राज्यपालांना कमर्शीअल फ्लाईटने उत्तराखंडला जावे लागले. दरम्यान मागील वर्षभरात राज्यपालांचे वागणे हे संशयास्पद असून कायम राज्य सरकारच्या विरोधातच त्यांनी भूमिका घेतल्याचे ठाकरे सरकारचे म्हणणे आहे. तर राज्यपालांना चार्टर्ड फ्लाईट नाकारणे हे दुर्दैवी असून इतका इगो असलेले सरकार आम्ही बघितले नाही, असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारकडून या चार्टर्ड विमानासाठी लाल सिग्नल दाखविण्यात आला. त्यामुळेच राज्यपालांना उत्तरांखडच्या दौऱ्यावर जाण्यासाठी चार्टर्ड विमान उपलब्ध होऊ शकले नाही. या चार्टर्ड विमानात बसल्यावर राज्य सरकारने या विमानासाठी परवानगी दिली नसल्याची बाब समोर आली. त्यामुळेच राज्यपालांना चार्टर्ड विमानाएवजी नियमित अशा कमर्शीअल फ्लाईटमधून प्रवास करण्याची वेळ आली. या कर्मशिअल फ्लाईटमधून राज्यपाल उत्तराखंड दौऱ्यासाठी निघाले असल्याचे कळते.

ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील वादात आजच्या फ्लाईट रद्द होण्याच्या घटनेमुळे आणखी एका मुद्द्याची भर पडली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उत्तराखंड दौऱ्यासाठी निघाले होते. परंतु राज्य सरकारकडून विमान उड्डाण करण्याची परवानगी मिळाली नसल्यामुळे प्रवास रद्द केला आहे. उत्तराखंड दौऱ्याचा भाग म्हणून राज्यपाल यांचे विमान देहरादून येथे उतरवण्यात येणार होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा शुक्रवारी त्याठिकाणी नियोजित कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी ते निघाले होते. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी सरकारी विमानात बसले होते. जवळपास १५ मिनिटांच्या कालावधीनंतर राज्यपाल विमानातून खाली उतरल्याने विरोधकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विरोधकांनी देखील या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे.

कसा आहे घटनाक्रम

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मसूरीमध्ये एका नियोजित कार्यक्रमासाठी जायचे होते. राज्यपाल आज उत्तराखंड दौऱ्यावर निघाले होते. यासाठी ते सरकारी विमान वापरत होते. सकाळी ९.२५ वाजता राज्यपाल राज भवनावरुन निघाले १० वाजता राज्यपाल विमान तळावर पोहोचले त्यांचे विमान १०.३० वाजता उड्डाण घेणार होते. राज्यपाल विमानात जाऊन बसले परंतु १५ मिनिटे झाले तरी विमानाने उड्डाण घेतला नाही. त्यामुळे राज्यपालांनी विमानातून पायउतार करुन पुन्हा विश्रांती गृहात येऊन बसले. काही मिनिटानंतर नियमित अशा कर्मशिअल फ्लाईटमधून राज्यपालांनी आपला देहरादूनच्या दिशेने प्रवास सुरू केला असल्याचे कळते.

First Published on: February 11, 2021 12:04 PM
Exit mobile version