मविआकडून अखेर विधानपरिषदेची १२ नावे ठरली; राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष

मविआकडून अखेर विधानपरिषदेची १२ नावे ठरली; राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष

राज्यपाल नियुक्त १२ जागांची यादी तयार

मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर महाविकास आघाडी सरकारकडून विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी नावे अंतिम केले आहेत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत १२ नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यानंतर १२ नावांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे. आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावावर सहमती दर्शविल्यानतंर शिवसेनेचे नेते परिवहन मंत्री अनिल परब, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन ती यादी राज्यपालांना सुपूर्द केली. यानंतर माध्यमांशी बोलताना परब म्हणाले की, “राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठीचे नावे राज्यपालांना दिले आहेत. त्यासोबत मुख्यमंत्र्यांचे पत्र आणि मंत्रिमंडळ ठराव देखील राज्यापालांना देण्यात आला आहे. सर्व कायदेशीर बाबी पुर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे राज्यपाल लवकरच या यादीवर शिक्कामोर्तब करतील, असा आम्हाला विश्वास आहे.”

शिवसेना

उर्मिला मातोंडकर
चंद्रकांत रघुवंशी
विजय करंजकर
नितीन बानगुडे पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस

एकनाथ खडसे
राजू शेट्टी
यशपाल भिंगे
आनंद शिंदे

काँग्रेस

रजनी पाटील
सचिन सावंत
मुझफ्फर हुसेन
अनिरुद्ध वनकर

First Published on: November 6, 2020 7:29 PM
Exit mobile version