2019चा विजय आमचा होता, हे बोलण्याचा अधिकार भाजपाला नाही; नीलम गोऱ्हेंची टीका

‘2019 निवडणुकीत जशी आम्हाला त्यांची मतं मिळाली, तशीच त्यांनाही आमची मतं मिळाली. त्यामुळे त्या विजयावर बोलताना तो विजय आमचा होता, हे बोलण्याचा अधिकार भाजपाला नाही’, असा शब्दांत ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे भाजपावर टीका केली. बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांचे प्रेरणास्थान आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. नुकताच नीलम गोऱ्हे यांनी स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. (Thackeray Group Leader Neelam Gorhe Slams BJP)

बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केल्यानंतर पत्रकाराशी बोलताना नीलम गोऱ्हे यांनी भाजपार निशाणा साधला. “2014 ची विधानसभा निवडणूक आम्ही एकहाती जिंकली. तसेच, 2019 लोकसभा निवडणुकीत जरी भाजपासोबत युती असली तरी, आमचे खासदार अपेक्षेप्रमाणे चांगले निवडणून आले आहेत. त्या निवडणुकीत जशी आम्हाला त्यांची मतं मिळाली, तशीच त्यांनाही आमची मतं मिळाली. त्यामुळे त्या विजयावर बोलताना तो विजय आमचा होता, हे बोलण्याचा अधिकार भाजपाला नाही”, अशा शब्दांत नीलम गोऱ्हे यांनी टीका केली.

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल ज्यांच्या मनामध्ये आस्था आहे. त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे हे प्रेरणास्थान आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाला याआधीही आव्हान देण्याचे प्रसंग घडलेले आहेत. आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त अनेक उपक्रम केले जात आहेत. हे उपक्रम करताना आपण राजकारणाच्या पलिकडे गेले पाहिजे असे मला वाटते. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा उद्धव ठाकरे चालवत आहेत. तसेच, शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर सोपवायची हा बाळासाहेब ठाकरे यांचा निर्णय होता. त्यानुसार 2012 आणि 2017च्या महापालिका निवडणुका आम्ही जिंकल्या आहेत”, असेही नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

“बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे विधान भवनात अनावरण होणार आहे. विधान भवनातील कार्यक्रमाला मला जाणे क्रमप्राप्त आहे. कारण कार्यक्रमाची मी संयोजक आहे. त्यामुळे सभागृहातील आमदार आणि इतरांची जशी भूमिका असते, तशी आमची भूमिका नसते. त्यामुळे माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यानुसार, मला विधिमंडळात जावे लागणार आहे”, असेही नीलम गोऱ्हे यांनी म्हटले.


हेही वाचा – साहेब! मला क्षमा करा; नारायण राणेंची लेखातून बाळासाहेबांना मानवंदना

First Published on: January 23, 2023 1:53 PM
Exit mobile version