छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचा भाजपाने लावला नव्याने शोध; संजय राऊतांचा हल्लाबोल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचा भाजपाने लावला नव्याने शोध; संजय राऊतांचा हल्लाबोल

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला संपूर्ण जगाला माहीत आहे. या महाराष्ट्रातला बच्चा-बच्चा सांगेल शिवनेरी किल्ल्यावर महाराष्ट्राचा राजा जन्माला आला. पण भाजपाने शोध लावला की शिवनेरी नाही. भाजपानी शिवनेवरीवर फुली मारली, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता भाजपा नेते प्रसाद लाड यांच्यावर हल्लाबोल केला. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवादरम्यान छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाल्याचे विधान केले. प्रसाद लाड यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोडही उठवली आहे. (Thackeray Group MP Sanjay Raut Slams BJP Leader Prasad Lad over Chhatrapati Shivaji Maharaj Controversial statement)

खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधतना प्रसाद लाड यांच्यावर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला संपूर्ण जगाला माहीत आहे. या महाराष्ट्रातला बच्चा-बच्चा सांगेल शिवनेरीवर महाराष्ट्राचा राजा जन्माला आला. पण काल भाजपाने शोध लावला की शिवनेरी नाही. फुली मारली, इतिहासातून यांनी शिवनेरी काढून टाकली. छत्रपतींचा जन्म महाराष्ट्रातच झाला हे तरी मान्य आहे का आपल्याला? छत्रपती जन्माला आले होते हे तरी तुम्ही स्विकारता का? याचे भारतीय जनता पक्षाला उत्तर द्यावे लागेल”.

नेमके काय काय घडले?

मुंबईत भाजपाकडून कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कोकण महोत्सवात बोलताना शनिवारी आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाबाबत विधान केले. “स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी हे तुम्ही विचाराल, हिंदवी स्वराज्याची स्थापन छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा कोकणात झाला. यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले, त्यांची सुरूवात कोकणात झाली”, असे आमदार प्रसाद लाड बोलत असल्याचे दिसले. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र त्यानंतर प्रसाद लाड यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून यावर स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली आहे.

“छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. महाराजांची कर्मभूमी कोकण होती, स्वराज्याची मुहूर्तमेढ कोकणात रोवली गेली हे देखील विसरून चालणार नाही, अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. परंतु त्वरित चूक दुरुस्त केली. विश्वाचे आराध्य दैवत शिवरायांचा सन्मान आम्ही यापुढेही ठेवणार! कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो,” असे स्पष्टीकरण प्रसाद लाड यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिले.


हेही वाचा – ‘राज्यपालांच्या राजभवनात घुसून त्यांचा चहा न पिता…’ संजय राऊतांचे आशिष शेलारांना आव्हान

First Published on: December 5, 2022 12:31 PM
Exit mobile version